Monday, 25 March 2024

कोण होणार पुण्याची पसंत?

 

कोण होणार पुण्याची पसंत?

मुरलीधर, धंगेकर या वसंत


 

राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि पुण्याच्या मतदारांना एकचं प्रश्न पडला तो म्हणजे अण्णा ,भाऊ कि तात्या ? महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर तर महायुतीकडून पुण्याचे माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाली. तर दुसरीकडे खासदारकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन बंड करत कात्रज मधील वसंत मोरे यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न चालू ठेवले. मोहोळ आणि धंगेकर हि दोन नावे  समोर आली आणि मोरे यांच्यासाठी असणारी आघाडीची संधी हुकली असच म्हणावे लागेल. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीचा धडाका लावत मोरे यांनी पुण्यात शरद पवारांनी भेट घेतल्यानंतर थेट मुंबई गाठून त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही. लवकरचं मनसेकडून साईनाथ बाबर यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते. त्यामुळे पुणेकरांना खरी लढत हि मुरलीधर विरुद्ध धंगेकर विरुद्ध मोरे अशी पाहायला मिळणार यात शंका नाही.

 

कोथरूडच्या माजी आमदार आणि विद्यमान राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील छुपा संघर्ष पुणेकरांना माहितच आहे. मुरलीधर मोहोळ यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली तेव्हा भाजपकडून इच्छुक असलेले जगदीश मुळीक आणि मेधा कुलकर्णी यांची अनुपस्थित विचार करायला लावणारी होती. या अंतर्गत वादाचा फटका भाजप ला बसू शकतो यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेत लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांनी, सदिच्छा भेट घेतली. कोरोना काळात त्यांच काम पुणेकरानी पाहिलं आहे. आणि भाजप ला मानणारा मोठा वर्ग मोहोळ यांच्या पाठीशी असला तरी धंगेकर यांना सामान्य लोकांचा नेता म्हणून जी प्रशिध्दी मिळाली त्याला नजरेआड करता येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष न पाहता धंगेकर यांचं कार्य पाहत मतदान झाले. मुस्लिम बहुसंख्य असलेला मोमीनपुरा किंवा गंज पेठेतील बहुजन समाज अन पुण्यातील झोपडपट्टीतील नागरिकांचा तसेच दलित बांधवांचा लय या धंगेकरच्या बाजूने दिसून येतो.

 

भाजपने प्रचंड यंत्रणा लावूनही धंगेकरना  मिळणारा विजय हा त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा जरी असला तरी हि लोकसभेची निवडणूक आहे कसब्याची नाही हे आघाडीने लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्वाची अन लक्षवेधी ठरणार ती धंगेकर आणि मोहोळ यांची जात. धंगेकर हे स्वतः ओबीसी समजातून आहेत तर मोहोळ हे मराठा समाजातून. सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून मराठा विरुद्ध ओबीसी हे दोन गट सक्रिय आहेत. त्यामुळे जसे जसे मतदानाचा दिवस जवळ येईल तसे तसे जातीवर आधारित आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण देखील खेळले जाण्याची शक्यता आहे. मोहोळ हे सत्तेत आहेत आणि मराठा समजाला अद्याप हव तस आरक्षण विद्यमान सरकारकडून मिळाले नाही. त्यामुळे मराठा समाजाची नाराजी मोहोळांना महागात तर धंगेकरांना फायदेशीर ठरेल.

 

वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत वादावर प्रश्नचिन्ह उपस्तिथ केल्यामुळे पुणे शहरात असणारे महाराष्ट्र सैनिकांचा राग मोरेना झेलावा लागणार. लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेन, असा दावा वसंत मोरेंनी केला होता. परंतु त्यांना मसनेकडून संधी मिळणार नाही हे उघड दिसत होते. आघाडीचे अन युतीचे मतदान त्यांना मिळणार नाही. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली पण तिकीट मिळेल याची खात्री नव्हती. तात्यांच्या हातोड्या ने अनेकांचे प्रश्न सोडवले. जनतेसाठी खुला दरबार त्यांनी भरवला. सोशल मीडियावरून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. कोरोना काळात देखील वसंत मोरे यांनी त्यांची दमदार कामगिरी दाखवून दिली. 'काहीही झाले तरी आपण पुण्यात मैदानात उतरणारच,’ असा निर्धार मोरे यांनी बोलून दाखवला.

पत्रकार मीडिया तसेच पुण्यातील अनेक छोटे मोठे सामाजिक संस्था अन कार्यकर्ते यांच्याशी मोरे यांचा दांडगा संपर्क असला तरी आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना आसमान दाखवण्यासाठी मोरे यांना फार मेहनत घ्यावी लागणार.

 

पुण्यात आता भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार, याचा नेमका कोणाला फायदा आणि तोटा होणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

 

 

मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळांचा पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. ते पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी २००२, २००७, २०१२ आणि २०१७ झाले आहेत. २०१७-१८ पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष राहिले होते. २०१९- २०२२ मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते. कोरोना काळात मोहोळांनी आपलं पुणेकराप्रती असलेली काळजी आणि प्रेम दाखवून दिलं. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यातील प्रमुख नेत्यांपासून केंद्रातील नेत्यापर्यंत प्रत्येक वरिष्ठ नेत्याशी त्यांचा चांगला संपर्क देखील आहे. २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद होते. २०२३ मध्ये प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती.

 रवींद्र धंगेकर

विधानसभेत भाजपच्या बालेकिल्ल्याला ४० वर्षांनी सुरुंग लावत काँग्रेस ला विजय प्राप्त करून देत चर्चेत रहाणारे रवींद्र धंगेकरांनी आज पुण्यात चांगलीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक ते आमदार अशी त्यांची ओळख.  शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९७मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. १९९७ , २००२ , २०१२ या कालावधीत ते नगरसेवक झाले. शिवसेना ते मनसे ह्या प्रवासानंतर २०१७ ला त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये मनसेकडून कसबा पेठ विधानसभा लढवून त्यांनी ४६ हजार ८०० मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधले होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव करीत धंगेकर प्रकाशझोतात आले. सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहणारे, अडीअडचणीत धावून येणारे लोकप्रतिनिधी अशी धंगेकर यांची ओळख.

 वसंत मोरे- 

वसंत मोरे यांची पहिली ओळख म्हणजे कट्टर राज समर्थक. २००७ मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले. या विजयात वसंत मोरेंचा मोलाचा मोठा वाटा होता. साल २०१७ मध्ये वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. पुणे महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद देखील भूषवले आहे. जनतेची केलेली सेवा ते व्हिडीओमार्फत सोशल मीडियावर टाकतात. त्यामुळेच त्यांना राज्यभरात ओळख.

  

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale