सावरकरांना
भारतरत्न कधी देणार ?
“स्वातंत्र्यवीर
सावरकर यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे
असं वारंवार म्हटलं जातं. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने
त्यांचा खरा गौरव करावा,
अशी मागणी आधीपासून केली जात आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच भारतरत्न पुरस्काराची मोठी घोषणा केली
यात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी,
पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह, एम. एस. स्वामिनाथन
आणि कर्पुरी ठाकूर यांची नावे जाहीर झालीत
परंतु या यादीत एक
नाव राहून गेलं ते म्हणजे
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. राजकीय स्वार्थापायी वीर सावरकरांचा अपमान
काही लोक देशात वारंवार
करत आहेत, त्यांना उत्तर द्यायचे असेल तर स्वतःला
हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांनी सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे. ४
जून २०२४ च्या निवडणुकीच्या
निकालानंतर देशात कोणते सरकार असेल याची चाहूल
सगळ्यांना लागलीच आहे. अश्यावेळी सावरकरांच्या
नावाचा जयघोष फक्त राजकीय मंचावर
न होता ती कृतीत
होयला हवी.
सरहद्द
गांधी व बादशाह खान
या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान
यांना १९८७ साली भारतरत्न
दिले. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय
होते. मदर तेरेसा यांना
इ.स. १९७९ मध्ये
त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा घाईघाईने इ.स. १९८० मध्ये
त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात
आला. तर नेहरू गांधी
घरात तीन भारतरत्न जवाहरलाल
नेहरू यांना इ. स. १९५५
साली, इंदिरा गांधी याना १९७१ साली,
राजीव गांधी यांना १९९१ साली. अश्या
अनेकांची वर्णी या यादीत लागली.
खरंतर भारतरत्न हा भारतातील
सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च
प्रतीचे काम करणाऱ्या भारताची
कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी
सन्मान देऊन गौरविले जाते.
अनेकांना मरणोपरान्त भारतरत्न दिले गेले
आहे. ‘भारतरत्न’ देण्यासाठी कुठल्या राज्याने
किंवा संस्थेने शिफारस
किंवा प्रस्ताव देण्याची
आवश्यकता नसते.’ असे
उत्तर गृहमंत्रालय च्या वतीने लोकसभेत
सांगितले गेले आहे. मग
सावरकरांना भारतरत्न देण्यात विलंब का लागतोय?
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य
लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेले
असे जहालमतवादी क्रांतीकारक. दूरदृष्टी, विज्ञानवादी क्रांतीकारक ही सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची
दुसरी बाजू होय. 'तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधु
बंधु' अशी साद देत
अस्पृश्यता निर्मुलनाच्या कार्याची सुरूवात त्यांनी केली. अस्पृश्यता निर्मुलन, व्यायामप्रसार आणि स्वदेशीचा आग्रह
ही त्यांची त्रिसुत्री होती. त्या काळात अस्पृश्यांसोबत
कुणी एकत्र जेवत नसे. पण,
सावरकारांनी हा रिवाज मोडीत
काढत सर्वांसाठी एकत्र पंगत सुरू केली,
ऐवढंच नाही तर, गजानन
दामले यांच्या व्यवस्थापनाखाली त्यांनी 'अखिल हिंदू उपहारगृह'
सुरू केले. मुर्तीला किंवा देवाला स्पर्श करून त्यांना दर्शन
घेता येत नसे. याकरता
त्यांनी भागोजीशेठ किर यांच्या मदतीनं
सर्वधर्मियांसाठी अशा पतित पावन
मंदिराची स्थापना केली. तीस-पस्तीस सुविद्य
स्त्रिया, वीस-पंचवीस अस्पृश्य
स्त्रिया यांचे पहिले स्नेहभोजन याच पतित पावन
मंदिरात पार पडले. सावरकरांनी
उ:शाप, सन्यस्त खडग
ही नाटके लिहिली. 'हिंदूपदपातशाही' हा इंग्रजी ग्रंथ
लिहिला. लिपीशुद्धी आणि भाषाशुद्धी यांची
आवश्यकता प्रतिपादन करणाऱ्या पुस्तिका लिहिल्या. शिवाय, महाराष्ट्राच्या वाड्:मयांत अमर
ठरलेलं 'माझी जन्मठेप' हे
पुस्तक देखील. स्वदेशीला ते महत्व देत
होते. साखर विकल्यानंतर जेव्हा
वर्षाकाठी केवळ दोन रूपयांचा
फायदा झाला असं त्यांना
सांगितलं गेलं तेव्हा, त्यांनी
'अरे किमान ते दोन रूपये
तरी आपल्या देशात राहिले नाहीतर ते इंग्रजच घेऊन
गेले' असते असं उत्तर
दिलं. १९०५ च्या बंगालच्या
फाळणीला विरोध करण्यासाठी, सावरकरांनी बाल गंगाधर टिळकांच्या
उपस्थितीत इतर विद्यार्थ्यांसह विदेशी
कपड्यांची होळी पेटवली. क्रांतिकारक मार्गाने संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली.
भविष्याचा वेध
घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी, आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय
व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारीत कादंब-यांचा लेखक, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युलतेच्या
लेखणीने लिहीणारा व उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान घेऊन राष्टभक्तीचा स्फुल्लींग
चेतविणारा ग्रंथकार, अतीत कालातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखविणारा द्रष्टा इतिहासकार,
भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. विषयाचा व्यासंग, स्वतंत्र
दृष्टीकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस स्वाभिमान आणि वस्तुनिष्ठ, साधार व स्फूर्तीदायक
विवेचन ही त्यांच्या इतिहास ग्रंथांची वैशिष्ट्ये. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी
महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. सावरकरांनी ज्या ज्या वेळी कृतीसाठी पाऊल
टाकले, त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या, त्यांच्या कविमनाचे जे जे सौंदर्यग्रहण
केले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून जगापुढे मांडल्या. कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक,
चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून
त्यांनी आपली साहित्यसंपदा सृजन केली. 'गोमांतक’, ‘सप्तर्षी’,‘रानफुले’,‘सावरकरांची
कविता’,‘कमला’,‘अग्निजा’,‘मूर्ती
दुजी ती’,‘सावरकरांच्या अप्रसिध्द कविता’,‘अग्निनृत्य’,
‘कुसुमसंचय’ इत्यादी काव्य सावरकरांनी लिहिले. हिंदुराष्ट्राला काळाच्या
तडाख्यातून वाचायचे असेल तर श्रुतीस्मृतिपुराणोक्ताची ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि
हिंदुधर्माला प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम व विज्ञाननिष्ठ असे रूप दिले पाहिजे, असा
इशारा दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतील अस्पृश्यता कायद्याने नष्ट
करण्याच्या कलमामुळे आनंद होऊन सावरकरांनी ‘जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख’हा
लेख लिहिला.
सचिन कृष्णा
तळे

No comments:
Post a Comment