“मला मराठी येत नाही, आणि मी ती शिकणारही नाही” – सुशील केडिया च गर्विष्ठ विधान!
मराठी भाषेला स्वाभिमानाने नकार देणाऱ्या सुशील केडिया नावाच्या उद्योजकाने अलीकडेच जाहीरपणे म्हटलं की, “मला मराठी येत नाही आणि मी ती शिकणारही नाही.”
👉 हा अपमान फक्त भाषेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाचाही आहे.
🌐 सुशील केडिया कोण आहे?
सुशील केडिया हे “K&A Securities” या शेअर बाजार सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. ते एक “Equity Strategist” म्हणून ओळखले जातात आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचांवर भाष्य करतात.
मात्र, महाराष्ट्रात व्यवसाय करून, मराठी ग्राहकांच्या खिशातून पैसे कमावणारे हे गृहस्थ मराठी शिकायला नकार देतात ही केवळ गर्विष्ठता नाही, तर मूलगामी असंवेदनशीलता आहे!
आम्ही कोणत्याही भाषेचा विरोध करत नाही, पण मराठीला हिणवणाऱ्यांचा नक्कीच निषेध करतो!
प्रश्न इतकाच आहे - जर तुम्हाला या भूमीची भाषा स्वीकारायची नसेल, तर या भूमीवर व्यवसाय करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?
महाराष्ट्रात राहायचं, इथल्या मातीचा लाभ घ्यायचा, पण भाषेला अपमानित करायचं हे आम्हाला मान्य नाही!
✍️Sachin Jayshree Krishna Tale
आहे ते आहे
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sanjay Raut
#मराठीचा_अपमान_खपवणार_नाही
#माझी_मराठी_माझा_अभिमान
#BoycottKedia
#SpeakMarathi
No comments:
Post a Comment