Tuesday, 3 February 2026

बीडची ‘बारामती’ घडवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर

 स्वप्न अपूर्ण राहणार नाही! बीडची ‘बारामती’ घडवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर

बीड जिल्हा… अनेक दशकांपासून मागासलेपणाचा शिक्का घेऊन उभा असलेला, पण विकासाची तीव्र आस मनात जपणारा जिल्हा. हाच जिल्हा ‘बीडची बारामती’ व्हावा, हे स्वप्न स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केवळ पाहिलं नव्हतं, तर आपल्या कार्यकाळात त्या स्वप्नाला दिशा देण्याचा ठाम प्रयत्नही केला होता.



पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या पाच स्तंभांवर बीडचा नवा चेहरा उभा राहावा, अशी दादांची स्पष्ट भूमिका होती. मात्र त्यांच्या अचानक झालेल्या विमान अपघाती निधनानंतर हे स्वप्न अधुरंच राहणार की काय, अशी भीती जिल्ह्याच्या जनतेच्या मनात घर करून बसली होती.

“आता बीडचं काय?”

“दादांचं व्हिजन पुढे कोण नेणार?”

“पालकमंत्री कोण होणार?”

“धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार का?”

असे असंख्य प्रश्न बीड जिल्ह्यातील चहाच्या टपऱ्यांपासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेत होते. मात्र आज पालकमंत्रीपदाचा निर्णय झाल्यानंतर आणि राजकीय चित्र स्पष्ट होत. चालल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे समोर येत आहे

अजितदादा पवार यांचं स्वप्न आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे.


राजकारणातील अनुभव, संघटनात्मक ताकद आणि दादांच्या विचारांची जवळून ओळख असलेल्या सुनेत्रा पवार या केवळ नावापुरत्या वारसदार नसून, त्या त्या स्वप्नाच्या खऱ्या वाहक ठरणार, असा विश्वास आता हळूहळू जनतेमध्ये बळावत आहे.

“बीडची बारामती” हे केवळ घोषवाक्य न राहता, प्रत्यक्षात जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल का?

विकासाचा गतीमान आराखडा पुन्हा मार्गावर येईल का?

हे येणारा काळ ठरवेल.

बीडच्या विकासस्वप्नाची ज्योत विझलेली नाही… ती आता नव्या हातात, नव्या आत्मविश्वासाने पेटलेली आहे.


जे आहे ते आहे

@ Sachin Krishna Tale

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale