Saturday, 18 March 2023

भाषा निर्माण करण्याची गरज का पडली , वाचा एक छानशी दंतकथा !

 भाषा निर्माण करण्याची गरज का पडली , वाचा एक छानशी दंतकथा !


आपण रोज बोलतो, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला पठवून देतो.  हट्ट करतो, हट्ट पुरवून हि घेतो. आपल्याला जर काही हवं असेल तर आपण आपल्या आई-वडील, आजी-आजोबा किंवा भावाकडे बहिणीकडे अन मित्रांकडे त्या विषयी सवांद साधतो. हा सवांद साधताना ज्या शब्दाची आपण मदत घेतो ते शब्द म्हणजेच आपली भाषा. आपल्याला आपल्या आई वडिलांकडूनं, आपल्या शिक्षकांकडून शिकायला मिळाली ती भाषा. लहान असताना आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात ते आपण काळजीपूर्वक ऐकत असतो. एकदा का ते शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ कळला कि आपण त्या नुसार चालतो आपण तसंच वागतो. भाषा हि आपल्या मनातील राग, आनंद, मनोगत, भावना, विचार, कृती इत्यादी गोष्टी प्रगट करण्याचे साधन आहे. 


जगात ६८०० हुन अधिक बोलीभाषा आहे. आपल्या भारतात तब्बल १२२२ भाषा रोज वापरात आहे. त्यातली २२ भाषा ह्या मुख्य भाषा आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो. जर आपण आपल्या जवळची कुठली हि दहा रुपयाची नोट पहिली तर त्यावर प्रमुख १५ भाषांचा समावेश आहे. दहा लाख किंवा त्याहून अधिक लोक आपल्या रोजच्या व्यवहारात वापरतात त्याच १५ प्रमुख भाषा आपल्या भारतीय नोटांवर तुम्हाला दिसेल. आपली मातृ भाषा मराठी हि सुद्धा ह्याच प्रमुख भाषेत आहे. ज्ञानेश्वरांनी लहानपणी ह्याच भाषेच्या मदतीने रेड्यातोंडी वेद वदवून घेतले होते. आता हि झाली भाषा बद्दलची थोडक्यात माहिती. भाषेवर बोलायला सांगायला गेलं तर खूप काही आहे. ह्याच भाषेवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो . भाषा कशी तयार झाली, भाषा तयार करण्याची गरज का पडली आणि भाषेचं महत्व आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी व आपल्यासाठी का महत्वाची आहे ती.


एक राजा होता आणि त्याचं भलं मोठ असं राज्य होतं. त्या राज्यात सर्व प्रजा हि सुखी होती समाधानी होती. त्या राज्यातले लोक हि फार आनंदी आणि समृद्धता मध्ये नटलेले होते. कोणाची नजर न लागो असं ते राज्य होतं. एक दिवस त्या राज्यावर एका क्रूर राजाची नजर पडते. त्याला तिथलं वैभव पाहावलं जातं नाही. दोन्ही राजाची राज्य भाषा हि सारखी होती त्यामुळे त्या राज्यात काय चालयं हे त्याला लगीच कळत असे. तो क्रूर राजा आपला गुप्तहेर त्या राज्यात पाठवून त्याच्या मदतीने तिथली माहित गोळा करायचा आणि त्या राज्यावर सारखा आक्रमण करून तिथली संपत्ती लुटायचा. पण इथली माहिती तिथल्या क्रूर राजाला कशी काय कळतीय हे कळतचं नव्हतं. कोणीतरी आहे जो माहिती गोळा करतो आणि त्यांना देतोय हे लक्ष्यात आल्यावर राजाने दरबार भरवलं. दरबारात सगळे जमा झाले. राजा, प्रधान, पंडित, कलावंत, कवी, लेखक, भाषिक, तज्ञ् आणि काही प्रजा. विषय निघाला त्यावर बरीच चर्चा झाली. पण प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं. शेवटी एक व्यक्ती समोर आला आणि म्हणाला "राजे माझ्या कडे एक युक्ती आहे जर तुमची इच्छा आणि आदेश असेल तर मी सांगतो" राजा म्हणाला "हो सांगा... त्यासाठीच इथे तुम्हाला सगळ्यांना मी आज बोलावलं आहे" तो व्यक्ती आपले मत मांडू लागला. त्याचे विचार व युक्ती राजाला आवडली. लगेच राजाने फरमान सोडला, आदेश सोडला अन एका तज्ञाला बोलावून त्यानुसार ते कार्य चालू केलं. कवी लेखक कलावंत शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाच्या मदतीने राज्यात लोकांपर्यंत ते पोहोचवलं गेलं. प्रधान जातीने दिवसरात्र त्यावर नजर ठेवू लागला. एक दिवस संपूर्ण राज्य त्या युक्ती वर चालू लागली. आणि त्याचा परिणाम हि त्या राजा व प्रजेसमोर आला. त्या क्रूर राजा ला हार पत्करावी लागली कारण त्याला आता कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्याचा तो गुप्तहेर हि पकडला गेला.


तर त्या व्यक्तीने अशी कोणती युक्ती सांगितली होती जी राजाने त्याच्या साह्याने आपले राज्य वाचवले. 


ती युक्ती होती भाषा बदलण्याची. एक अशी भाषा निर्माण करायची जी कोणाला कळणार नाही. जी भाषा आहे त्या भाषेला अनुसरून एक अशी भाषा हवी कि जी फक्त आपल्या राज्यातल्या लोकांनाच कळेल. दोन्ही राज्यातली भाषा हि सारखी होती म्हणून इथली सर्व माहिती त्या क्रूर राजाला मिळायची. त्या प्रकारे राज्यातल्या तज्ञाकडून एक भाषा तयार करण्यात आली. ती कवी लेखक शिक्षक ह्यांच्या द्वारे राज्यात शिकवली गेली. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीस एक ओळख पत्र देऊन त्यांची कार्यशाळा चालू केली. राज्यात परराज्यातील नागरिकांना बंदी आणली. बघता बघता एक दिवस सगळे जण तीच भाषा बोलू लागले. भाषा बदलली हे त्या क्रूर राजाला माहित नव्हतं. जेव्हा त्याने त्याचा गुप्तहेर त्या राज्यात पाठवला तेव्हा त्याला काहीच कळेनासं झालं. त्याची चोरी पकडली गेली. त्याला दरबारी उभ करून शिक्षा झाली. काही दिवसाने जेव्हा त्या क्रूर राजाने आपल्या सैन्यासोबत आक्रमण केले तेव्हा तिथली रचना व त्या राजाने आखलेली रण योजना कळलीच नाही. शेवटी त्याला हार पदरी घेऊन परतावे लागले.


तर मित्रानो, एक भाषा बदलली म्हणून त्या चांगल्या राजाने आपले राज्य वाचवले. त्याच प्रकारे आपली मराठी, कोकणी, अहिराणी तर बाजूच्या राज्यात तामिळ , तेलगू, कन्नड, पंजाबी, उर्दू असे अनेक भाषा निर्माण झालेत. आज आपल्या देशावर आक्रमणे झाली आणि होत आहेत. आपल्या देशात हिंसा पसरवली जाते. कारण  शेजारच्या देशांना आपली सगळी माहिती मिळते. त्यांना आपली हिंदी हि भाषा येते अन कळते हि. त्यांना हिंदी ह्या भाषेच ज्ञान आहे. आपल्या भारतात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत आणि पाली भाषा हि सुद्धा प्रचलित आहे. आणि त्याच्याच ह्या पोटजाती. संस्कृत ह्या भाषेला आपण देव भाषा म्हणतो आपल्या पूजा अर्चना मध्ये त्याचा वापर करतो. आपले ग्रंथ ह्याच भाषेत लिहिली गेली. देवांना हि भाषा आवडते. जर देव देश वाचवायचा असेल तर भाषा शिकली पाहिजे.  संत ज्ञानेश्वर महाराज ह्याच आपल्या मराठी भाषेची थोरवी सांगताना लिहितात. 



जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।

तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।

तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।

भाषांमध्ये तैशी। मऱ्हाटी शोभिवंत।।

माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।

ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।


सचिन कृष्णा तळे 

Thursday, 16 March 2023

अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ

 


आंबेडकरी साहित्य संमेलनांना १९९३ पासून सुरुवात झाली. मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली ही संमेलने आयोजित झाली होती. या सर्व मान्यवर विचारवंतांनी 'आंबेडकरी साहित्य' या संज्ञेचा पुरस्कार केला. मुळात या संमेलनांची आयोजनं ज्या पद्धतींनी झाली, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या आयोजनासंदर्भातली आयोजकांची भूमिका निश्चितच आंबेडकरी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी पोषक असे सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करणारीच होती. त्यामुळे संमेलनाचा आराखडा, नियोजन आणि कार्यक्रमाच्या बाबतीत आवश्यक असणारी समकालीन कल्पक भूमिका यासाठी सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक होते. या सामूहिक गरजेतून महामंडळाची संकल्पना पुढे आली. २१ सप्टेंबर २००८ ला झालेल्या बैठकीत प्रा. सतेश्वर मोरे यांच्या पुढाकाराने ' . भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाची' स्थापना करण्यात आली. प्रा. सतेश्वर मोरे यांची महामंडळाचे निमंत्रक म्हणून तर अशोक बुरबुरे यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती.

हे महामंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांचे असेल अर्थात या महामंडळाचे सदस्य व्यक्ती नसून संस्था असतील, त्याच बरोबर आतापर्यंत ज्या संस्थांनी अथवा आयोजन समितीने या संमेलनाचे आयोजन केले आहे त्या संस्था अथवा त्या आयोजन समितीचे अध्यक्ष सचिव यांना महामंडळाचे प्रथम सदस्य करण्यात आले. आणि त्यातूनच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सांस्कृतिक क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असणाऱ्या नोंदणीकृत / अनोंदणीकृत संस्था महामंडळाच्या सदस्य होऊ शकतील. अशी अट ठेवण्यात आली. अत्यंत दर्जेदार आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करत प्रा. सतेश्वर मोरे यांच्या नेतृत्वात महामंडळाचे नाव सर्वदूर पोहचले. प्रा. मोरे यांच्या अकाली निधनानंतर महामंडळाची धुरा अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सीमा मेश्राम आणि निमंत्रक म्हणून प्रशांत वंजारे हे समर्थपणे सांभाळत आहेत

शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत घेता साहित्य संमेलनाचे आयोजन करावे अशी महामंडळाची भूमिका असल्याने सदर महामंडळाची शासन दरबारी नोंदणी करण्यात आलेली नाही. साहित्य संमेलने ही सांस्कृतिक आयोजने असल्यामुळे ती कार्यकर्त्यांच्या मेहनतीतूनच झाली पाहिजे, असा महामंडळाचा आग्रह आहे. महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत १४ अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनांचे आयोजने करण्यात आले असून नऊ अखिल भारतीय युवा आंबेडकरी साहित्य संमेलनांची आयोजने करण्यात आलेली आहेत. विविध संस्थांकडून संमेलनाच्या आयोजनाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महामंडळाकडून त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येते. तीन . भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलने, वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलने, ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलने, पाच आंबेडकरी संवाद संमेलने, काव्यसंगीती, विद्यार्थी साहित्य संमेलने ही महामंडळाची अलीकडच्या काळातील विशेष उपलब्धी आहे. पाच मार्च २०२३ रोजी अमरावती शहरात महामंडळाच्या नेतृत्वात आंबेडकरी गझल संमेलन सुद्धा आयोजित करण्यात आले होते

केवळ विदर्भ हा महामंडळाचे कार्यक्षेत्र नसून मराठवाडा आणि तेलंगणा राज्यात सुद्धा महामंडळाची संमेलने आयोजित करण्यात आलेली आहेत. वैचारिक शिस्त आणि सूत्रबद्धता यासाठी हे महामंडळ ओळखले जाते. महामंडळाचे हितचिंतक आणि कार्यकर्ते भारतात सर्वदूर पसरले असून त्यांच्या सहकार्यानेच महामंडळाची वाटचाल सुरु आहे.

 

Sunday, 12 March 2023

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

 



सोशल मीडियाच्या बदलत्या प्रवाहाचा वापर करून मराठी भाषा आणि मराठी शाळा यांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून काही समविचारी सदस्य एकत्र आले आणि ज्ञानभाषा मराठी या समूहाची स्थापना झाली. मराठी भाषेचा मुद्दा हा केवळ सांस्कृतिक व भावनिक नाही तर, त्याला वैज्ञानिक बैठक आहे, या जाणिवेतून सतत चार वर्षे ऑनलाईन काम करताना संस्थेची गरज भासू लागली, यासाठी 'ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना जून २०१७ रोजी करण्यात आली. बारामती कृषी केंद्र येथे डॉ. वसंत काळपांडे सर यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन झाले.

 

विज्ञान, तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यावर लेखन करणार्‍यांना प्रोत्साहन देणे. ज्ञानवर्धक माहिती निर्माण करणे. मराठी माध्यमातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा लोकांसमोर आणणे. मराठी ही प्रशासकीय लोकव्यवहार आर्थिक व्यवहारभाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे हे मुख्य उद्दिष्टे असून प्रतिष्ठानने  'माझी शाळा माझी भाषा' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रभरातील शिक्षकांचे समूह तयार केले आहे. संस्थेतर्फे शिक्षकांना भाषा, विज्ञान तसेच इतर विषयांबद्दल उपयुक्त माहिती पुरविली जाते. 'मराठी भाषेचे पुस्तक,' 'मी मराठी शाळा बोलतेय' या संकल्पना संस्थतर्फे गुढीपाडवा शोभायात्रेत सादर केला जातो. प्रतिष्ठानच्या समूहातर्फे गेले पाच वर्ष 'मराठी भाषा पंधरवडा' साजरा केला जातो. या मराठी भाषा पंधरवड्यात भाषेचे विविध पैलू लोकांसमोर मांडले जातात. त्यानिमित्ताने ऑनलाइन परीक्षा,स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वांना मराठी भाषेतून व्यक्त व्हावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.९० वे आणि ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, डोंबिवली आणि यवतमाळ येथे झाले; त्यावेळी मराठी भाषेचा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या जाणिवेने प्रतिष्ठानने एक दालन घेऊन प्रचार केला; हे असे एकमेव दालन होते की जे, कोणत्याही व्यापारी उद्देशाने घेतलेले नव्हते; त्याचा उद्देश फक्त मराठी भाषा प्रचारार्थ होता.

 

मातृभाषेतून शिक्षण घेताना मराठी शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांचे अभिनंदन करावे म्हणून काही पालकांचे मुलांसहित फलक तयार करण्यात आले. 'रविवार ऑनलाइन वाचनकट्टा' हा गेले ५ वर्षे प्रतिष्ठानतर्फे राबवला जाणारा अतिशय अभिनव उपक्रम आहे. विंदा वंदन, हास्य कट्टा, दिवाळी अंक वाचन असे प्रत्यक्ष वाचनकट्टे पुणे आणि डोंबिवली,/इचलकरंजी येथेही राबविण्यात आले. हे कट्टे गेली २ वर्षे सातत्याने सुरू आहेत. प्रतिष्ठानचे जिल्हानिहाय कृतीगटसुद्धा स्थापन करण्यात आले आहेत. पुणे, डोंबिवली, नाशिक या गटांची स्थापना करून त्यामार्फत शाळांमध्ये जागृती करण्यात येत आहे. 'चला अनुवाद करूया' या उपक्रमाद्वारे इंग्रजीतील आणि बोलीभाषेतील तसेच इतर भाषेतील ज्ञानवर्धक माहिती अनुवाद रूपाने लोकांसमोर आणण्याचे कार्य संस्थेचे चालू आहे. सर्वत्रमराठी या संकल्पनेवर आधारित प्रतिष्ठानचे आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्र विचारात घेऊन स्थापत्यशास्त्र, पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र,निसर्ग संवर्धन, तंत्रज्ञान असे १०० च्या आसपास समूह तयार केले आहेत. या समूहातून ज्ञानवर्धक चर्चा घडविल्या जातात. विविध स्तरावरून येणारे प्रश्न या गटात विचारले जातात; त्याच्यावर सखोल चर्चा करून "ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या ब्लॉग" वर ती माहिती संकलित करून प्रसारित केली जाते.मराठी भाषा आणि मराठी शाळा याप्रती बांधिलकी जपत ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान भविष्यात नक्कीच भरीव कार्य करील यात शंका नाही.

Wednesday, 1 March 2023

माझ्या शाळेतल्या आठवणी.  


वयाने कितीही आकडे गाठले तरी शाळेच्या आठवणी न विसरणारेच असतात. गृहपाठामुळे नकोशी वाटणारी शाळा मोठ्यापणी मायेची आठवण करून देत असते. शाळा छोटी असो कि मोठी, वर्ग आणि त्या वर्गात सोबत राहणारी मैत्री आणि त्या मैत्रीतून फुलणारी मस्ती धमालच असते सगळी. एकट्यात आठवलं तर मनात हसू येत आणि मित्रांच्या सोबत गप्पांमधून आठवलं तर प्रेमळ झराच फुटतो. अश्या ह्या शाळेबद्दल जितकं बोलावं जितकं लिहावं तितकं कमीच. 


शाळेने आयुष्य घडविले, इतकंच नाही तर आयुष्यभर आठवणीत राहतील अश्या चांगल्या गोष्टी शाळेने मनात रुजवल्या. पावसाळ्यात सुरु होणारी पहिली शाळा, त्यासाठी लागणारी पुस्तके आणि त्या पुस्तकाला कव्हर लावून घेण्यात येणारी मज्जा. नव्या पुस्तकांचा सुगंध आणि त्यात कोणते चित्र आहेत ते पाहण्यात पहिले काही दिवस सरसपणे निघून जातात. बालभारती ते भूगोल , इतिहास , नागरिकशास्त्र , विज्ञान , गणित अश्या पुस्तकांनी अन वह्यांनी सजलेल दप्तर. 


दिवसांवरून दिवस , एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, परीक्षेवरून परीक्षा अन मार्कशीट वरील मार्कांनी सहज १० वर्ष शाळेच्याच अंगणात निघून जातात. पास नापास च्या जाळ्यातून स्वतःची सुटका करत मनातला विद्यार्थी रुपी कैदी जेव्हा महाविद्यालयात आणि खऱ्या आयुष्यात पाऊल ठेवतो तेव्हा जाणवत कि शाळेची कैद म्हणजे बालहट्ट अन संस्कार घडवणार खरं गुरुकुल.  चक्रवाढ व्याज, लसावि, मसावि सारं माझ्या डोळ्यापुढे फिरायचं आणि डोक्यावरून जायचं. ज्ञानेश्वरांचं पसायदान ही आमची प्रार्थना. शाळेच्या समोर मोठं मैदान, मैदानाच्या बाजूला कार्यक्रम भरवण्यासाठी हॉल, पहिल्या पायरीवर सरस्वतीची सुंदर मूर्ती, काही पायऱ्या चढल्यावर वर्ग आणि हेडमास्तर चा रूम, पिण्याच्या पाण्यासाठी १० नळ, भिंतीवर राष्ट्र महापुरुषांच्या प्रतिमा, संगणक रूम , विज्ञान खोली , आणि ग्रंथालय. हीच होती माझ्या शाळेतल्या आठवणी.  

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale