साहित्याचे "बारा
"
अध्यक्षाची गेली
"मती " वाया
विक्या आणि मी … आम्ही
दोघे ही फार जुने मित्र , म्हणजे बालदोस्त चं . आठवड्यात एकदा तरी आम्ही नक्की भेटतो
. पण ह्या विक्या ला एक लंय घाण सवय . भेटला की गप्पा मारता मारता सध्या च्या घडामोडीवर
येवून आपटणार . शिक्षणाने कमी जरी असला तरी विक्याचं डोस्क लय भारी .
नेहमीप्रमाणे ठरलेल्या
वेळात नाक्यावरच्या टपरी वर मी आलो . पण विक्या आला नव्हता ... त्याची वाट पाहत तिथेच
बसलो . जवळचा वृत्तपेपर नाकाच्या थोडा वर नेला… म्हंटलं
विक्या येईपर्यंत थोड्या बातम्या चाळून घ्यावं . तर पहिली बातमी नजरेत पडली ती , साहित्य
संमेलनाचे नवे अध्यक्ष सबनीस ह्यांची . अमुक अमुक ठिकाणी त्यांचा पुतळा जाळला . तर
अमुक तमुक संघटनांनी त्यांना पाठींबा दिला म्हणून . काही दिवसापूर्वी त्यांना टीव्हीवर
पाहिलं , खूप चिडलेले होते , नेमेके काय बोलतायत ते मला हि नाही कळाल .पण त्यांना कोणीतरी
धमकी बिम्की दिली होती म्हणून .
" दाद्या… " विकास ने लांबून आवाज दिला
घरात लहानपणा पासून
मला दादा असेच म्हणत होते , त्यामुळे समद्यांनी मला दादा … हेचं नाव पाडलं .
"दाद्या …
" विकास जवळ आला आणि म्हणाला .
" दाद्या .. कसा
दिसतोय , मी … "
मी म्हणालो ,
" आरे व्हा .. स्वारी कुठे बाहेर जाण्याच्या
तयारीत दिसत्तीय, आणि ही काय वेशभूषा केलीय . सद्रा , लटकवलेली कापडी झोळी, खाकी ज्याकेट व
दोन पुस्तक . साहित्यिक बिहीतिक झालस की काय ? .
"नाही रे दाद्या
, सांगतो गम्मत … आधी कटिंग मागवं "
नामदेव काका कटिंग
घेवून येतात . मग आमच्या गप्पा चालू झाल्या . पण ह्यावेळी विक्या ने डायरेक्ट विषयावरच
बोट ठेवला .
" विक्या … काय गम्मत आहे रे … "
" आरे मी यंदाच्या ८९ साहित्य संमेलनात ' कविता ' सादर करणार
आहे . "
" आरे व्हा …
" थोडा अभिमानाने पण विचाराच्या गोंधळात . विकास कविता करतो . तेही महिन्यातून
चार या पाच . एक या दोन कविता प्रकशित झालेल्या विकास ला इतक्या लवकर इतक मोठ व्यास
पीठ मिळेल अस वाटल नव्हत . म्हणून सहज विचारपूस
केली .
" छान .. अभिनंदंच
रे विक्या .. , पण कस काय जमलं … काही सटिंग लावलीस की काय ? "
थोड्या हळू आवाजात
विकास म्हणाला …
" आरे … आपल्या
गावातले … पुस्तकी काका आहेत ना … ज्यांच्या घरात खूप पुस्तके आहेत बघ !
… त्यांच्या ओळखीचे कोणीतरी म्हणे साहित्य
संमेलन चे अध्यक्ष झालेत , त्यांनी सहज मला विचारलं … बाळ विकास तू मोठ्या व्यासपीठावर
कविता सादर करणार का ? "
" तुला माहितीय
ना … मी संधिसाधू आहे ते … वेळ न घालवता लगेच होकार दिला … "
इतक्या मोठ्या व्यासपीठाची
हि चेष्टा पाहून आश्चर्य झालो . नोवोदित मित्रांना संधी मिळतीय म्हणून आनंद झाला .
अन त्याला सहज प्रश्न विचारला .
" विक्या … तुला
श्रीपाल सबनीस माहित आहे का रे ? " विकास थोड्या विचारात …
" नाही रे … कोण
हे सबनीस ''… त्याच्या ह्या प्रश्नाने मी थोडा हसलो …
" आरे … वेड्या
… ज्या संमेलनात तू कवितासादर करणार आहे त्यांचे ते अध्यक्ष आहेत … "
" नाही रे
… दाद्या … नव्हत माहित मला … आता … ह्या आधी
कधी संमेलनाचा आणि माझा दूर दूर तरी संबंध आलता का ? " आरे थांब …
हो … आठवल … मध्ये
त्यांनी अस म्हंटल होत की " पवारांचे माझ्यावर कोणतेही उपकार नाहीयेत करून … बरोबर
ना , आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी ह्यांना त्यांनी आरे तुरे ची भाषा केलती म्हणे
"
" हो रे विक्या
… मुळात सबनीसांची ओळख ही एका डबक्या पुरतंच . आता पवार साहेबांची मदत घेवूनही … साहेबाना
विसरला तो … तर त्याच्या साठी राबलेल्या कार्यकर्त्यांच कस असणार हा विचार कर
"
"
थोड्या विचारात चहा
चा एक घोट घेतला
" आता हे बघ
.. ही बातमी वाच .. " पेपर त्याच्या हाती दिला .. वाचून झाल्यावर ..
" दाद्या हा खर
बोलत असेल का रे ? त्याला नक्की मागितला असेल का रे … राजीनामा . "
" आरे विक्या
माधवी वैद्य ह्याचे स्टेटमंट वाच की मग .कळेल तुला … " थोड्याश्या वर आवाजात
" मित्रा … आधी
सबनीस कोणालाच माहित नव्हते , पण आज सबनीस सर्वाना माहित झाले . प्रसिद्धी मिळवण्या
साठी हे कराव लागत रे . आज त्यांना पोलिसांची सुरक्षा आहे . रोज वृत्तपत्रात बातम्या
आहेत . आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या व्यासपीठाला इतिहास आहे त्या व्यासपीठाचे
ते अध्यक्ष्य झालेत . म्हणजे इतिहासात जमा झाले ना . "
" आरे हो कि
… दाद्या "
" साहित्य संमेलनात
राजकारण असत पण इतक … "
" संमेलन गरम च असत विक्या … आधी तो चहा घे थंड झाला
बघ " मस्करीत .
" विक्या
.. जेव्हा सबनीस निवडून आले , तेव्हाच यंदाच्या
साहित्य संमेलनाचे बारा वाजले . पण संमेलनाची खुर्ची च्या मोहाने , सबनीसांची मती वाया गेलीय .
"
" अस आहे का
.. म्हंजी अस म्हण की , साहित्याचे वाजले ' बारा ' अन अध्यक्षाची गेली 'मती ' वाया
“
हसत हसत , दोघांनी
हातातला कप खाली ठेवला , आणि निघालो आपापल्या घरी .
सचिन कृष्णा तळे (पुणे)
7709099646

जय जिव्हेश्वर ! छान लेख आहे !
ReplyDelete