Tuesday, 23 May 2017

मंजूळा ग मंजूळा ..
माझ्या जीवाचा झालाय खुळ खुळा ..

रातीचा दिवस हि करतीया
जीवात जीव हि भरतीया
बसता जवळ लाजतीया
पोरगी कमाल हि दिसतीया

तुझ्या रूपाचा ..हा गावरण पावसाळा
मंजूळा ग मंजूळा ..
माझ्या जीवाचा झालाय खुळ खुळा ..

पेटता मशाल विझतीया
जवानी अंगभर जळतीया
हातात हात  धरतीया
नखरे दार कस चालतीया

तुझ्या प्रितीचा ..भरलाय गावरान मळा
मंजूळा ग मंजूळा ..
माझ्या जीवाचा झालाय खुळ खुळा ..

हिचा पदर हवेत उडतोया
जीवा वर जीव जडतोया
तुझ्याच साठी ग लढतोया
पाठी पाठी पाठी  पळतोया

तुझ्या प्रितीचा..हा रंगला सोहळा
मंजूळा ग मंजूळा
माझ्या जीवाचा झालाय खुळ खुळा

सचिन तळे






No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale