Thursday, 25 May 2017

आहेस तू आहेस कुठे

आहेस तू  आहेस कुठे 

नाही इथे नाही तिथे ,आहेस तू आहेस कुठे ?
शोधू कुठे शोधू तुला , आहेस तू आहेस  कुठे ?

प्रेमात प्रेम झालो मी ,राहिलो फक्त यार तुझा
सांग आज सांग ना , प्रेमास तू आहेस कुठे ?

ही धुंद हवा बेधुंद नशा ,स्पर्शाचा खेळ सारा   
सहवास हा भास हा ,जगण्यास तू आहेस कुठे ?

पाहतो जे स्वप्न मी, ते स्वप्न नवे तुझ्यामुळे
माझ्या फुला थांबना, फुलण्यास तू आहेस कुठे ?

तुझ्या माझ्या गोष्टीतले, राजाराणी आपण दोघे

छोटयाश्या विश्वामध्ये, राहण्यास तू आहेस कुठे ?     

नाही इथे नाही तिथे ,आहेस तू आहेस कुठे ?
शोधू कुठे शोधू तुला , आहेस तू आहेस  कुठे ?

सचिन कृष्णा तळे


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale