Friday, 22 September 2017

माणुसकीच्या गाभाऱ्यातून


माणुसकीच्या गाभाऱ्यातून

चोरला अभंग त्यांनी माणुसकीच्या गाभाऱ्यातून
खुशाल लुटावं देव माझा तुमच्या विज्ञानातून

श्रद्धा असावी भक्ती असावी खोल मनामध्ये
वडीलधाऱ्या माणसातून हृदयातल्या देव्हाऱ्यातून

झाडाची मुळे खोलवर! तितकीच असते भक्कम
यशाची पायरी हि मिळते मेहनतीच्या रस्त्यातून

पैसा महत्वाचा ! नाती हि महत्वाची आहे
पोटासाठी घरामध्ये भासलेल्या गरजेतून

संसाराची गाडी रुळावर तेव्हाच पळ पळ पळते
जेव्हा विश्वासाची पटरी बनते दोघांच्या प्रेमातून

देशासाठी जाग तू ! सीमेवरच्या सैनिकांसाठी
राजकीय घडामोडीतून सामाजिक कार्यातून 

सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६



 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale