पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
गावाच्या त्या वाटेला वडराजाचं महाल रं
नाही कुणी येत नाही कुणी जात रं
पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
घटना काय घडली वडाच्या पायथ्याशी रं
काल्पनिक कि आजीच्या मुखातली रं
फक्त मनाच्या भूत्यास एकचं ध्यास थरथरत
ह्या वडाच्या शेजारी नांदे भुताची चावडी रं
पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
वडाच झाड तस फार जून भक्कम रं
भवताली पारंबी अन घनदाट जंगल रं
जणू बसली म्हातारी जट मातीत रुजून
तिच्या जटावर वटवाघुळांची रात्र उगवे रं
पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
ह्याच वडाच्या शेजारून चालला एक राजा रं
अडला दगड पडला मुखाशी भोळा शंकर रं
त्याला वाटे पछाडल ह्या वडाच्या येताळा नं
बोभाट झाल गावभर त्या वडाच्या नावानी रं
पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
आता पंखही न भारी कोणी इतक भय त्या वडाच रं
इचारल पर्याय काय ? गावातल्या पुजारीस रं
बुवा म्हणे बांधा एक मंदिर येताळा चं
द्या कोंबड बकर्र त्या वडाच्या भूत्यास रं
पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
आता बसला खरा खुरा येताळ मातीच्या गाभारी
झाली भूत बाधा तर येतात त्याच्या दारी
अंध श्रद्धेची खरी खुरी हि व्याख्या न पटणारी
देव बसिवला हातानी ह्या वडाच्या पायथ्याशी रं
पारंबीच्या येशीला येताळाची माडी रं
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment