मुंबई माझी
पाहुनांच्या पाहूनचारात भिजलेली मुंबई माझी
परप्रांतीयांचे लोंढे वाहत थकलेली मुंबई माझी
कामगारांची, हुतात्म्यांची अन बेरोजगारांची
कष्टाच्या घामामध्ये शांत निजलेली मुंबई माझी
मोठ मोठ्या इमारती अन चंदेरी ह्या दुनियेत
मराठी अस्मिता नि भाषा जपलेली मुंबई माझी
राजकीयांची, उद्योगांची, टपरी वाल्या भैयांची
आपल्याच हातातून थोडी निसटलेली मुंबई माझी
विरार ठाणे कर्जत ते पनवेल नवी मुंबई
कोणासाठी इतकी हि, वाढलेली मुंबई माझी
देशात, जगात जिचा असतो सारखा बोलबाला
हवीहवीशी स्वप्न सुंदरी ती नटलेली मुंबई माझी
थोडी फास्ट थोडी स्लो धावणारी मुंबई माझी
आतंकी नजरेतूनही सावरलेली मुंबई माझी
सिद्धिविनायक महालक्ष्मी हाजी एकविरा मुंबापुरी
देवाना हि आवडे सात बेटावरली मुंबई माझी
धर्माचे जातीचे जिथे अगणित झाले सोहळे
हर सणात साजरी होती दुखावलेली मुंबई माझी
"आई मुंबई तुझ्या पदरी माझी मराठी जगावी"
इतिहासात कित्येकदा धडपडलेली मुंबई माझी
बाळासाहेबांच्या भाषणांनी दुमदुमलेली मुंबई माझी
सरकारला हि झुकवणारी भिडलेली मुंबई माझी
सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६

No comments:
Post a Comment