Tuesday, 27 March 2018

हिरवळ क्रांती चोहीकडे


निसर्गाच्या कुशीतले ,जे वरदान मिळाले आम्हा
त्या झाडांची वेदना का, उशिरा कळाले आम्हा

जगण्यासाठी काय हवे, काय हवे वसुंधरेला
हिरवळ क्रांती चोहीकडे, पाना फुलांची काया

हवा, पाणी, प्रकाश कोण देई मूलभूत गरजा 
निर्मात्याने काय दिले, ते डोळे उघडून पहा

मातीमधुनी जन्म त्याचा, तोच आपुली छाया
गाव वस्ती शहर सगळे त्याचाच आहे पसारा

दुष्काळात का आठवतो ,कुठे विसावतो प्रेमात
त्याच्या नसण्याने, काय शोधतो आपण उन्हात

झाडावरचे एक एक घाव अन जखमा जाऊन पहा
मुक्याने सोसले किती, खरा देव कोणता शोधा

शेतात रानात वनात आणि डोंगर दऱ्या खोऱ्यात
निरोगी आयुष्याची ही संजीवनी आपल्या हातात

झाडे जगवा झाडे लावा, खरी श्रीमंती ही जपा
झाडांसोबत प्रगतीचे, चला इतिहास नवा रचवा

सचिन तळे
7709099646



No comments:

Post a Comment

फ्रान्समधील वणवा आणि भारताची वास्तववादी प्रगती: अराजकता नव्हे, तर विकासाचा मार्ग धरा!

    "फ्रान्समध्ये घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा गैरफायदा घेऊन भारतात अस्थिरता पसरवू पाहणाऱ्यांनी हा इतिहास आणि वर्तमानाचा डोळसपणे अभ्यास कर...