Wednesday, 28 March 2018

एक मोर्चा निघतो


मोर्चा इथे रंगाचा, जातीचा, दहशतवाद्यांचा निघतो
कायद्याच्या चौकटीत शेतीचा, लोकशाहीचा निघतो

ज्याचा त्याचा स्वार्थ, ज्याची त्याची प्रगतीची वाट
त्या गर्दीत मात्र घाम, सामान्य जनतेचा निघतो

आवाज उठवण्यासाठी संघर्ष हवा एक लढा हवा !
मात्र नेत्यांसाठीच का ? हा खोटा पसारा निघतो

सीमेवर धारातीर्थ जेव्हा पडतो अमर सैनिक
तेव्हा त्याच्या डोळ्यातुन अश्रू देशभक्तीचा निघतो

नोकरी शिक्षण उदयॊग अन प्रगतीची दिशा
बेरोजगार महागाई , सवाल प्रश्नाचा निघतो

सगळ्या धर्माचा आदर, ज्या देशात आज आहे
त्या देशासाठी कुठे, साधा एक मोर्चा निघतो


सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६




No comments:

Post a Comment

फ्रान्समधील वणवा आणि भारताची वास्तववादी प्रगती: अराजकता नव्हे, तर विकासाचा मार्ग धरा!

    "फ्रान्समध्ये घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा गैरफायदा घेऊन भारतात अस्थिरता पसरवू पाहणाऱ्यांनी हा इतिहास आणि वर्तमानाचा डोळसपणे अभ्यास कर...