Saturday, 20 July 2019

प्रेमातल्या पावसाचा

तुझ्या प्रेमाच्या पावसाने
माझ्या कवितांच्या शब्दाने
घेतले मिठीत दोघांना
दोघांना एक करून
भिजवले एका नात्यात

आता तुझ नि माझं
विश्व एक
नातं एक
नाव एक
गाव एक

आता तुझी माझी वेळ एक
भेटायचे ठिकाण एक
सांगायला बोलायला खूप काही आहे
दोघांकडे ...
पण विषय एकच...  प्रेमाचा
प्रेमातल्या पावसाचा

सचिन तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale