'युवकमित्र
परिवार,पुणे
वाचनालय
नसलेल्या दुर्गम आणि ग्रामीण भागात 'गाव तिथे वाचनालय अन शाळा तिथे
ग्रंथालय' या ब्रीद वाक्यावर
काम करत वाचन चळवळ वृद्धिंगत करणारी 'युवकमित्र परीवार' पुणे ही नोंदणीकृत संस्था
युवाशक्तीवर आधारित समविचारी युवकांनी संघटित होत सन २०१५ साली
स्थापन केली. नंदुरबार येथील प्रवीण महाजन हे संस्थेचे संस्थापक
असून पुणे शहरात मोशी येथे या संस्थेचे कार्यालय
आहे. स्वातंत्रोत्तर काळात देशासमोर असलेल्या विविध समस्या पाहता त्यावर फक्त एकच उपाय म्हणजे शक्ती युक्ती अन बुद्धीचा वापर
करून युवकांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणे होय. ह्याच विचारातून युवकमित्र परिवार ची सुरवात झाली
आणि आज या संस्थे
मार्फ़त अनेक युवकांपर्यंत पोहचली , अनेक गावात , अनेक शाळेत अनके विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचली आहे.
साहित्यिक,
शैक्षणिक व युवा चळवळ
हे या संस्थेचे मुख्य
कार्यक्षेत्र आहे. या संस्थेमार्फत ग्रामीण
भागात गावापासून लांब, दूर असलेल्या शाळांमध्ये पायी जाणाऱ्या मात्र गरिबीअभावी सायकल खरेदी करू न शकणाऱ्या अत्यंत
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना
मोफत सायकली उपलब्ध करून देणे हे महत्वपूर्ण कार्य
चालू आहे. या सर्व सायकली
पुणे व मुंबई शहरातील
गृहनिर्माण सोसायट्यामध्ये पडून असलेल्या व नागरिकांनी स्वइच्छेने
दान केलेल्या जुन्या सायकली आहेत मात्र त्या संस्थे मार्फ़त दुरुस्त करून वितरण केले जातात. तसेच दुर्गम भागात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून पुणे मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेले जुने संगणक दुरुस्त करून दुर्गम शाळांमध्ये मोफत वाटप करून संगणक कक्ष उभारले आहेत.
युवकमित्र
परिवार तर्फे आजअखेर संस्थेमार्फत ११२ शाळामध्ये मोफत १००० पेक्ष्या अधिक संगणक कक्ष स्थापन झाले आहे. जस मिळेल तसं
, जिथे मिळेल तिथून पुस्तके गोळा करून ४१३ वाचनालये चालू करून समाजासमोर एक आदर्श या
संस्थेने स्थापन केला आहे. जुने संगणक,जुनी पुस्तके जुन्या सायकली व ई वेस्ट
संकलन करणाऱ्या या संस्थेमार्फत 'टाकाऊपासून
टिकाऊ' हे पर्यावरणदृष्ट्या पोषक अभियान
राबवले जाते. गावातील मुलांमध्ये वाचन चळवळ रुजवण्यासाठी अन या पुस्तक
रुपी साहित्यातुन उत्तम साहित्यिक घडवण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. तसेच हि संस्था युवक
कल्याण क्षेत्रात देखील कार्यरत आहे. दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन संस्थे मार्फत केले जात आहे. व्यक्तिमत्व विकास शिबीर , करियर मार्गदर्शन शिबीर असे शिबीर दरवर्षी संस्था आयोजित करत आली आहे.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment