Thursday, 11 April 2019

राजकीय कत्तलखाने


राजकीय कत्तलखाने

भारतात लोकशाही स्थापन झाल्यापासून अन राजेशाही काळ भूतकाळाच्या कागदावर इतिहासात जमा झाल्यापासून. राजकीय थाट हा जनतेच्या एका मतावर देशावर सत्तेचं राजकारण करू लागलं. राजकरणातून समाजकारण आणि देशाची प्रगती होऊ लागली. ह्या दरम्यान देशात अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष जन्मास आले आणि नष्ट सुद्धा झाले . काहींची घराणेशाही आजवर टिकली जगली पोसली ते राजकारण वर . अनेक राजकीय पक्षाने अभूतपूर्ण उत्तम कामगिरी देशात राबवून जनतेच्या मनात हृदयात स्थान मिळवलं. त्याच कामाचे दाखले देत पुढील वाटचालीचे धोरणे रणनीती आखत सगळेच राजकीय पक्ष आता सत्तेसाठी , खास करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचाराची धूळ उडवत आहेत. ह्याच धुळीत नेता आणि त्या नेत्याचे कार्यकर्ते आणि जनता पूर्णतः माखणार.  निवडणूक होई पर्यंत.

झेंडे हजार रंगवून झाले
नेते पालखीत बसवून झाले

लोकशाहीचे स्वप्ने पाहताना
दिस गुलामीचे आठवून झाले

नेता आणि कार्यकर्ता . लोकांसाठी लढणारा नेता आणि त्या नेत्यासाठी लढणारा कार्यकर्ता. एक अतूट नातं . नेता म्हणजे विश्वास आदर्श दैवत्वच कार्यकर्त्यांसाठी आणि कार्यकर्ते म्हणजे खरी दौलत ताकद नेत्यांची. नेता सांगेल त्या दिशेने कार्यकर्ते कार्य करत आणि कार्यकर्त्यांना काय हवे ते अचूक जाणून ठाम विचार नेता मांडत असे. त्याच्या एका विचारावर शब्दावर लाखो लोकांचे आणि समाजाचे प्रश्न मार्गी लागत.  त्यामुळे तेव्हाचे कार्यकर्ते हे निष्ठावंत होते आपल्या नेत्याशी एकमत होते.  ज्यांना त्या नेत्याचे निर्णय पटले नाहीत किंवा त्यांना काम करून हि योग्य तो अधिकार मिळाला नाही ते सोडचिट्टी देऊन चालते झाले. काहीं स्वतःचे पक्ष स्थापन करून स्वतःच नशीब अजमावत आहेत तर काहींनी दुसऱ्या पक्षाची पायरी धरली. काही उदाहरणार्थ सांगायचं तर शरद पवार काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस , नारायण राणे स्वाभिमान पक्ष , सेनेतून राज  ठाकरे ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेन पक्ष , छगन भुजबळ राष्ट्रवादी मध्ये इ .  राजकारणी भाषेत सांगायच झालं तर फितूर झाले , बंडखोरी केली , बेईमान झाले , खाल्या ताटात वैगैरे वैगैरे . पण नेत्यांनी हि विचार करणे खूप गरजेचे आहे जो कार्यकर्ता आपल्यासाठी आपल्या सुखदुःखात रात्रंदिवस झटला प्रचारासाठी हिंडला आणि स्वतःला सिद्ध करत पक्ष मदतीने नेतृत्व करू लागला तो अचानक नाराजी प्रकट करून पक्षातून बाहेर का पडतो . एक मजबूत कार्यकर्ता जेव्हा पक्षातून फुटतो त्यासोबत हजार कार्यकर्ते फुटतात त्या हजारांना मानणारा वर्ग हि नकळत पक्षापासून दूर होतो . फोडाफोडी हि खूप मोठी हानी सर्व राजकीय पक्षांना लागू पडते. ती हानी भरून काढण्यासाठी  पुन्हा खंबीर कार्यकर्ते उभे करण्यासाठी पक्षप्रमुखाना जीवाचं रान करावं लागत. खरंतर त्याच्यातल्या कार्यकर्त्याची कत्तल नक्की कुठे होतीय हे आजच्या राजकीय पुढार्यांनी संमजून घेयला हवं
.
राजकीय पक्ष म्हंटल तर स्वार्थ हा आलाच, वैचारिक चिखलफेक आलीच, चांगलं वाईट राजकारण हि आलच दिखावे पण आले. आताचे राजकारण पाहता कित्येक नेत्यांच्या निर्णयाने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण म्हणजेच राजकीय दृष्ट्या वैचारिक कत्तल झाली आहे आणि होतीय. हे चित्र फक्त एका पक्षापुरता नसून सगळ्या राजकीय पक्षात आहे.  पक्षांतर्गत नाराजी चे प्रमाण खूप वाढले आहेत. त्याचे कारण फक्त एक निर्णय. भर सभेत एकमेकांवर तोंडसुख घेणारे नेते  कार्यक्रमात जेव्हा एक होतात, दिलेल्या शब्दावर जागता शब्दांची हेराफेरी करत कार्यकर्त्यांना तोंडावर पाडतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांची काय मानसिक स्थिती होत असेल हे विचार करणे खूप गरजेचे आहे. आजचे नागरिक हे शिक्षित आहेत जाणते आहेत चांगल्या वाईट गोष्टीवर प्रखर मत मांडणारे आहेत. त्यात सोशल मीडिया म्हणजे स्वतःला प्रकट करण्याचे स्वतःचे मत मांडण्याचे एक अदृश्य असे व्यासपीठ प्रत्येकाला मिळालंय. देशात आणि राज्यात जर नजर फिरवली तर कार्यकर्त्यांची नाराजी हि सहज दिसून येईल. शिवसेना भाजपची युती तर महाआघाडीत मनसेची एन्ट्री तर मायावती अखिलेष ची झप्पी . चित्र डोळ्यासमोर आहे . नेते एक झाले पण जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधी लढले ते एक होतील का ? त्यांची वैचारिक लढाई एक होईल का ? 
सत्तेसाठी जगता जगता
सत्याला पार ठेचून झाले

अनेक जाती अन धर्मातुनी
असंख्य धागे विणून झाले

कालपर्यन्त भाजप आणि शिवसेना युती करणार नाही आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकून दाखवूची वार्ता करत करत अचानक आज युतीच्या बंधनात अडकून निवडणुकीचं रणशिंग फुंकले. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत मैदानात उतरण्याची तयारी करते आणि त्याला काँग्रेस कडून नकार मिळतो . काँग्रेसला विरोध करणारे कार्यकर्ते आघाडीत तसेच युती ला विरोध करणारे कार्यकर्ते महायुतीत खुश असतील का ? राजकीय दृष्ट्या नेत्यांनी निर्णय घेतले पण भावनिक दृष्ट्या कार्यकर्त्यांनी काय करावे. तेरी चूप मेरी चूप म्हणत फक्त कार्य करायचं कि सन्यास घेऊन दारा आत राहून फक्त बातम्या बघायचं. ज्या नेत्यासवे काम केलं ज्या पक्षाच काम केलं त्याची चुकीची भूमिका पाहून मत प्रकट करणे हि आजच्या कार्यकर्त्यांना सोपं नाहीय. जर तो पदाधिकारी असला तर प्रोटोकॉल पाळत त्याच पक्षात चूप बसायचं नाहीतर बाहेरचा रस्ता आहेच. जो प्रकट होतो तो बाटगा आणि जो गप्प बसतो तो निष्ठावंत. शेवटी हे सगळे वैचारिक भांडण असावं तरच चांगलं नाहीतर देशात राजकीय दंगे जास्त माजतील. प्रत्येक राजकीय पक्षाची एक वेगळी भूमिका आणि ओळख आहे त्यामुळे तेच पक्ष एकत्र दिसतील ज्यांचे विचारधारा हि एक आहे एका मुद्द्यावर आहे. काही राजकीयांची अशी हि ओळख आहे.  " तोडा फोड राज्य करा " " तुम्ही खा आम्हाला पण खाऊ द्या " " सत्तेसाठी काही हि "

महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या प्रचारातून शिवसेनेची खिल्ली उडवत मोठ्या भावाला कवटाळले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सभेतून वाघाची डरकाळी फोडत स्वबळावर लढण्याचे स्वप्न दाखवत सत्तेला लाथ मारता मारत पुन्हा भाजप च्या मदतीने भगवे झेंडे मिरवत निवडणुकीला सज्ज झाले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या व्यंग चित्रातून आपल्या शाब्दिक तोफखान्यातून अजित पवार, काँग्रेस ह्यांच्यावर टीका करून इंजिन आघाडीच्या सोबत ठेवून भाजप सेनेच्या विरोधी रुळावर सुसाट सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार साहेब केंद्रातून निशाणा लावत, रामदास आठवले आपल्या कवितेतून भाजप चे गुणगान गात फक्त एका जागेसाठी विद्रोही कवितांचा पाऊस मीडियासमोर पाडू लागले.

राज्यात घडणाऱ्या ह्या घटना पाहता कार्यकर्त्यांचे दिशाभूल हे त्यांचेच नेते करतांना दिसतायत. सत्ता असो नसो मिळो या मिळो स्वतःच्या ठाम भूमिकेवर एकही नेता आज नाही. जर असं असत तर देशात राम मंदिर असत , बेळगाव मधला मराठी बांधव महाराष्ट्रात असता , ओरंगाबाद आज संभाजी नगर म्हणून असत ,  काश्मीर मधील ३७० कलम कधीच उठवली असती, देशाशी गद्दारी करणारे देशाबाहेर नसते वैगैरे वैगैरे . 
शेवटी कार्यकर्त्यांच्या अफाट शक्तीचे भर सभेत खच्चीकरण करत वैचारिक खून केला जातो. त्याच्या कार्यावर त्याने पक्षसाठी दिलेल्या वेळेवर पाणी सोडल जात म्हणजेच आजचे राजकारण हे राजकीय कत्तलखाने आहेत जिथे कार्यकर्त्याचे वैचारिक कत्तल करत बळी दिली जाते.

मोर्चे बंद आणिक भाषणे
शंभर वेळा ऐकून झाले

दाराआड त्या बंगल्यामध्ये
कार्यकर्त्याना फसवून झाले

-सचिन कृष्णा तळे

Wednesday, 10 April 2019

धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर


धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर

उत्तरम्य समुद्रस्य, हिमाद्रे शैव लक्षणम्

वर्षम् भारतम् नाम् ,भारतीय यत्र संततिः

म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती म्हणजेच जे भारतात जन्मले  ते भारतीय. भारत ... हिंदुस्थान ... इंडिया. जगातल्या प्राचीन संस्कृती पैकी एक. क्षेत्रफळात सातव्या क्रमांकावर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला भारत देश. अनेक भाषा , प्रांत, रीतिरिवाज , तसेच अनेक सण आणि अनेक धर्माना आश्रय आणि श्रद्धा पूर्वक मानसन्मान देणारा एकमेव देश म्हणजे आपला भारत . जिथे मंदिराची आरती होते ,मस्जिद ची आजण होते , बुद्धांचे स्मरण होते , चर्चमधून प्रार्थना होते तर जिथे बदल अन परिवर्तन हे निश्चित आहे , जिथे अन्यायाला न्याय मिळते , जिथे भारताचे संविधान तितकेच महत्वाचे मानले जाते जिथके धर्मग्रंथ आहेत. अनेकतेतून एकता हीच ओळख आपल्या भारताची. हीच एकता कायम टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीय हा प्रतन्यशील असतो फक्त काही राजकीय समाजकंठक अन धृत माणसं सोडली तर. 

हिंदू म्हणून जन्मलो का हाच माझा अपराध आहे

माझ्याच देशात हिंदू म्हणून का माझा विरोध आहे

जागतिक पातळीवर जर पाहिलं तर  भारत हा असा एकमेव राष्ट्र असेल जिथे त्याच्याच भूमिपुत्रांना हक्कासाठी लढावं लागत , मरावं लागत . देशासाठी त्याच्या धर्मासाठी त्याला बलिदान द्यावं लागत. भाषेवरून अन धर्मावरून वेळोवेळो त्याचे खच्चीकरण केले जात. जर प्राचीन भारतावर नजर फिरवली तर सहज लक्ष्यात येईल कि , हिंदू आणि बोद्ध ह्या दोन विश्व सुंदर धर्माची , वटवृक्षाची मुळे हे भारतातच रुजली अन फुलली . इतर धर्म कसे आले आणि लादले गेले हे इतिहासाच्या रक्तरंजित पानांनी आजही ग्रंथालय सजले आहेत. त्याचे अवशेष सहज दिसून येतात. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या ह्या मूलभूत गरजा त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. ह्या गरजा जितक्या महत्वाच्या तितकंच महत्व आहे धर्म भाषा आणि देश. मूलभूत गरजा जगण्यासाठी तर घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी मानव हा धर्म जात अन भाषाचे वापर करतो.

ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे आपण देणे लागतो ह्याच धर्मावर माणूस हा समूह करून राहू लागला. आपली परंपरा संस्कृती जपणे आणि पुढच्या पिढीला ती समजून सांगणे हे आद्य कर्तव्य. धर्माची रक्षा करणे धर्म वाढवणे म्हणजे आपल्या धर्मात असलेले चांगले  विचार हे लोकांपर्यंत पोहचवणे , त्यांना मार्ग दाखवणे .  धर्मांतर हे स्वखुशीने असावे. ज्याला त्याला मार्ग मोकळा आहे. ज्याचे त्याचे विचार हे स्वतंत्र आहे . परंतु धर्माच्या ह्या कडव्या प्रचारात धर्मांतराची ठिणगी अशी पेटली कि माणूस हा अत्याचाराने , जबरदस्तीने , अन्यायाने धर्मांतर करू लागला ... लादू लागला.

वाटून घेतली धर्म जात अन माती

वाटून घेतली भाषा रंग अन नाती

वर्चस्व गाजवायच असेल तर एकता हि तोडायलाच हवी . एकमेकांबद्दल मतभेद निर्माण करणे , वैर निर्माण करणे , फूट पाडून कार्य सिद्धी करणे. "तोडा फोड राज्य करा" कदाचित ह्याच वाक्यावर धर्मांतर आणि राष्ट्रांतरच बीज पेरलं गेलं असावं. राष्ट्रांतर घडलं ते धर्मांतराच्या जोरावर हे जग जाहीर आहे. जर इतिहासाची पाने चाळली तर धर्मांतरच्या वाहत्या प्रवाहात किती राष्ट्रांचा जन्म झाला हे सहज कळेल. जगाच्या पाठीवरती जितके युद्ध झाले ते सगळे युद्ध स्वतःचे साम्राज्य वाढवण्यास कमी तर धर्माच्या प्रचारास अधिक झाले हे कटू सत्य आहे आणि ह्याच आगीच्या धुराळात असंख्य निष्पाप जीवांची होळी पेटवण्यात आली. पुढच्या पिढीला इतिहास कळू नये म्हणून असंख्य ऐतिहासिक स्थळे भुईसपाट करण्यात आले उध्वस्त केले गेले. आठ वर्षांपूर्वी अफगाणिस्थान मधील हिंदुकुश पर्वतरांगात जगातील मोठ्या मुर्त्यांपैकी असणारी बमियानचे  बुद्ध नष्ट  करण्यात आले. इतकेच नाही तर रस्त्यात येईल ते सर्व बोद्ध आणि हिंदूंचे धार्मिक स्थळांची तोडफोड अन विटंबना करून नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले. 

"देहकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो " सावरकरांच्या अश्या क्रांतिकारी विचारांना आपण सहज विसरतो किंवा त्या शब्दांच महत्व कळत नाही. जशी आपली संस्कृती तसा आपला देश. जर हि संस्कृतीचं बदली गेली तर देश हा बदलणारच. धर्मांतर जर वाढले तर राष्ट्रातंर हे होणारच.

Tuesday, 9 April 2019

नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी


मानाचा पहिला मुजरा शिवाजी राजांना
दुसरा शूरवीर शंभूराजांना
तिसरा ह्या महाराष्ट्र भूमीला
चौथा मुजरा घालितो बाळासाहेबांना त्यांच्या शिवसेनेला

ह्या महाराष्ट्र नगरी
शिरूर तालुका शिवधारी
भगव्याची कथा हि न्यारी
बांधून विकासाची दोरी
समाज सेवेतुन आला एक लोकनेता हो ... दारी
नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी

शून्यातून वाढवली गती
सामन्यातून त्यांची प्रचिती
कपाळी शिवतीर्थाची माती
लोकसभेत दादांची महंती 
सोबत मावळ्यांची गर्दी हो जी जी जी
नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी

कामातून दादांची ओळख
जनतेला हिऱ्याची पारख
त्यांनी उभारली शाळा
लोकांसाठी पतसंस्था
बैलगाडी शर्यतींना
अंगावर घेऊन दिली लढत
अणे-माळशेज रेल्वे मार्गाचा
केला त्यांनीच पाठपुरवठा
चाकण विमानतळासाठी
जनतेला मिळन्या संधी
पुढाकार घेतला दादांनी
रोजगार निर्मितीसाठी
जनसामान्यांचे प्रश्न
त्याला उत्तर दादांचं काम
बहू आले बहुरंगी
मैदानी दादाच ठाम
त्या शिरूर तालुक्याची
केंद्रात घेतली दाद हो जी जी जी
नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी

-  सचिन तळे

Friday, 5 April 2019

हॉव इज द जोश ... ?


हॉव इज द जोश ... ?




दिवसभर पक्षाच्या कार्यालयात प्रचाराची तयारी पूर्ण करून रात्री तो उशिरा घरी येतो. कपाटातले पांढरे खादीचे कपडे बाहेर काढून त्याला कडक इस्त्री करून बुटाला पॉलिश करून न जेवता तो झोपतो. असं हि त्याला जेवण जाणार नव्हतं कारण उद्या चा उजाडणार दिवस हा त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो . तो ज्या पक्षासाठी नेत्यासाठी दिवसरात्र लढायचा आज तोच नेता त्याच्या भागात गावात येणार होता. शेजारच्या गावात तस सभेचं रणशिंग फुंकेलेल होत. उद्या साहेंबाना पाहता येणार भेटता येणार त्यांना केलेलं काम दाखवता येणार म्हणून तो खूप खुश होता. कधी दिवस उजाडेल आणि मी साहेबाना भेटेल असं झालत त्याला. आपल्या सोबत .. साहेबाना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला त्याने कधी कुठे भेटायचं किती वाजता जमायचं ह्याचा एक मेसेज टाकला होता. घड्याळातला आलार्म चेक करून पंखा थोडा वाढवून जमीनीवर चादर  हाथरुन  शांत पडला. दिवसभर प्रचाराच्या गडबडीत थकल्याने त्याला कधी झोप लागली  ते कळलंच नाही.

सकाळ होते. आलार्म वाजतो. अंथरून आटपून मनातली उत्सुकता शिगेला पोहचते. तो तयार होतो थोडा नास्ता करून लगबघिने घरा बाहेर पडतो. गाडीला पक्षाचा झेंडा , डोक्यावर पक्षाची टोपी सोबत केलेल्या कामाची फाईल कात्रण. ठरलेल्या वेळेत सगळे जमतात. स्वागताची आणि रोड शो ची पूर्ण तयारी होते. साहेब कुठपर्यंत पोहचले ह्यावर फोना फोनी चालू होते. पहाटेपासून सगळे कार्यकर्ते साहेबांच्या भेटीला रस्त्यावर उभे असतात. पाण्याची बाटली अन बाजूच्या टपरीवर वडापाव खाऊन सगळे कार्यकर्ते गावाच्या वेशीवर. जागोजागी स्वागतासाठी छोटे मोठे जाहिराती आणि तयारी.

घड्याळाचा काटा सकाळच्या वाटेवरून दुपारच्या वाटेवर चालू लागतो. कार्यकर्त्यांच्या गर्दीत एकच कुजबुज . आरे साहेब आता इथे आहेत साहेब तिथे आहेत , साहेब अमुक ठिकाणी नास्ता करत होते म्हणून उशीर झाला , साहेब रस्त्यात अमुक अमुक व्यक्तीच्या बंगल्यावर थांबलेत . असो ह्या सगळ्या गडबडीत तो मात्र साहेबाच्या गाडीकडे नजर लावून बसलेला असतो. त्या दिवशी त्याच्या घरात काय चालू आहे हे त्यालाही माहित नसत (जेवढी आपण आपल्या नेत्याची वाट पाहत भर रस्त्यावर थांबतो तेवढी वाट आपण आपले आई वडील जेव्हा परगावावरून घरी येतात तेव्हा त्यांना स्टॉप वर घेण्यासाठी हि पाहत नाही). त्याला आतुरता असते ती फक्त साहेबाची. उन्हाचा पारा ३०-३५ च्या घरात पोहचतो. साहेबाची गाडी आणि त्याचा ताफा येण्यास अजून तरी वेळ असते. खबरी फोनाफोनी चालू असते. सगळे आपापल्या ग्रुप मध्ये उभे. बाजूच्या ग्रुपचा एक मुलगा वाट पाहत गर्मीने बेहोश पडतो . थोडी धावपळ चालू होते आणि लांबून साहेबाचा ताफा दिसतो.

साहेबाचा ताफा ते भले मोठे ७ ते ८  फुलली एअर कंडिशन हाईफाई गाडी. त्या पाठोपाठ आजून ५ ते ६ गाड्यांचा ताफा. त्या बेहोश पडलेल्या मुलाला बाजूच्या टपरीवर पंख्याखाली सोडून साहेबांच्या भेटीला सगळे तुटून पडतात. कोणाच्या हातात हार कोणाच्या हातात फुलाचा गुच्छा असतो. तर बरेच जण तो क्षण टिपण्यासाठी मोबाईल चा कॅमेरा ऑन करून ठेवतात. साहेब तिथून थेट सरकारी विश्रांत गृह जाईपर्यन्त बाईक रॅली आयोजीत होती. गावाच्या वेशीवर साहेबाची गाडी येऊन उभी राहते. पाठच्या गाडीतून साहेबाचे बॉडीगार्ड बाहेर पडतात आणि त्या गाडीला कव्हर करतात. ( जस चित्रपटात दाखवतात सेम टू सेम तस चालू असत) तो पाहत असतो. गाडीचा दरवाजा उघडतो. गाडीतली एअर कंडिशन हवा घेऊन बाहेर उन्हाच्या झळामध्ये साहेब स्वागत स्वीकारत होते. कोणाची घोषणा , कोणी फोटो तर कोणाची धावपळ चालू असते भेटीला. तो हि भेटीसाठी धडपडत असतो. साहेबाच्या भोवती कार्यकर्ते त्यांना त्या कार्यकर्त्यांना सावरणारे बॉडीगार्ड आणि घामाच्या धारेत हलकीशी थंड हवेची झुळूक. प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो अविस्मरणीय क्षण.

तापलेलं वातावरण पाहत साहेब गाडीत बसतात. काहींची भेट होते काहींची तशीच राहते. सगळे रोड शो साठी बाईक ला किक मारतात आणि साहेबाच्या गाडीसमोर  कर्कश आवाज करत झेंडे मिरवत गावात प्रचाराची धूळ उडवत शक्ती प्रदर्शन करत सरकारी विश्रांत गृही पोहचतात. तो पुन्हा भेटण्याची आन कार्याची संधी शोधू लागतो. पक्षाच्या आणि साहेबाच्या विश्वासातल्या लोकांना भेटतो. भेटी साठी त्यांना विनंती करतो. साहेब प्रवासात थकलेत ते जेवण करून थोडा आराम करून पुन्हा सगळ्यांना भेटतील. तो त्या वेळेची वाट पाहत पुन्हा थोडं हलकं फुलकं खाऊन घेतो. काही झालं तरी आज साहेबाची भेट घेयायची. घराचं दार ओलांडल्यापासूनचा त्याचा तो जोश तसाच कायम असतो. काही कार्यकर्ते घराकडे तर काही कार्यकर्ते तसेच तिथेच वाट पाहत. बाजूच्या गावात रात्री साहेबाची सभा असते. त्या गावात हि तोच जोश तीच लागभग चालू असते. पण तो मात्र तिथेच साहेबाची वाट पाहत. पुन्हा २-३ गाड्याचा  ताफा येतो काही नेते मंडळी गाडीतून उतरून साहेबाला भेटयाला जातात. तो हे सगळं न्याहारत संधीची वाट पाहत बसतो. बातमी समजते कि ते नेते मंडळी आज पक्ष प्रवेश करणार आहे. मिटिंग चालू असते आणि सभेची वेळ हि जवळ येत असते आणि त्याची उत्सुकता तशीच कायम आणि आशावादी.

मिटिंग संपते साहेब बाहेर येतात. सोबत नेते मंडळी अन बॉडीगार्ड. जमल तस तो गर्दीतून वाट काढतो. साहेबाच्या जवळ जातो . स्वतःची ओळख सांगतो.  साहेब पाठीवर थाप मारतो,साहेब  एअर कंडिशन गाडीत बसतो. ताफा निघतो त्याच्या डोळ्यासमोर ताफा हळूहळू दूर जातो. पण त्याला महत्वाची असते ती साहेबानी त्याच्या पाठीवर मारलेली थाप. २ ते ३ सेकंद साठी झालेली भेट. भेटीत साहेबांचे शब्द . तो अविस्मरणीय क्षण. चुकून तो क्षण कोणी टिपलाय का ? आजूबाजूला  त्यासाठी  केविलवाणा प्रयन्त. आणि त्या साहेबांवर असलेली निष्ठा तशीच कायम ठेवत पक्षासाठी पुन्हा कामाला लागतो.

हा जोश असतो तो खंदे कार्यकर्त्यात असतो .

सचिन कृष्णा तळे
पुणे कात्रज
दूरध्वनी - ७७०९०९९६४६








Wednesday, 27 February 2019

हे युद्ध आहे शुद्ध आहे


हे युद्ध आहे शुद्ध आहे

विशाल मस्तक विशाल भुजा
विशाल सागर तुझ्या चरणी
अमर गाथा अमर वीरांची
अमर तुझे बलिदान आहे
भारता हे युद्ध आहे शुद्ध आहे

वायू भू जल सारेच्या सारे
मुठीत तुझ्या आहे सीमा रे
प्रमाण तू अभिमान तू
अनंत तुझी कीर्ती आहे
भारता हे युद्ध आहे शुद्ध आहे

शत्रूराष्ट्र भयभीत झाले
पाहुनी भीम रूप तुझे
असुरांचा विनाश करण्या
शिव तांडवची गरज आहे
भारता हे युद्ध आहे शुद्ध आहे

रक्ताने अभिषेक तुझा
तुझ्या पदरात प्राण आमचा
चण्डिकेचे रुद्र रूप तुझे
तुला शस्त्राचा शृंगार आहे
भारता हे युद्ध आहे शुद्ध आहे

लक्ष नेमके साध भारता
वार्ता विजयाच्या कळव आता
संघर्ष हे अटळ आहे
कोटी घरांचा तू आधार आहे
भारता हे युद्ध आहे शुद्ध आहे

कृष्ण आहे रहीम आहे
सोबतीस येशू नानक बुद्ध आहे
रणांगणात तुझ्या पाठीशी
अखंड हिंदुस्थान आहे 
भारता हे युद्ध आहे शुद्ध आहे


- सचिन कृष्णा तळे



Tuesday, 26 February 2019

हे युध्द आहे शुध्द आहे

हे युध्द आहे शुध्द आहे

भारता उठ जरा
रंणशिंग फूक जरा
लक्ष नेमके साधता
हाे शत्रूवर विजय तू
कर हिंद जागृत तू
हाे रक्तरंजित तू
हिच वेळ आहे
प्रश्नाचे उत्तर आहे
शाेर्याचे प्रतिक आहे
हाे ...
हे युध्द आहे शुध्द आहे..
भारता
हे युध्द शुध्द आहे

जय हिंद
#सचिन_तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale