Sunday, 30 September 2018

Swaradnya Arts

New YouTube channel
#SwaradnyaArts

Please visit and like and subscribe

https://youtu.be/pAARgGY-6pU


Friday, 21 September 2018

मिळू दे भरारी



घेतो कोण आता ,दखल तेवढे सांगा 
शिल्लक आहे थोड्या ,आजून तक्रारी 

मी कुठे म्हणालो ,हवी घोडा गाडी 
सुखाची गोडी ,लोगो माझ्या संसारी 

नकोच मला ती, फुले ताजीतवानी 
कष्टानेच फुलु दे, कष्टाची बाग प्यारी

डोळ्यातल्या अश्रुना, स्वप्ने सुखाची 
माती होण्याआधी, मिठावी उधारी 

माझ्या फांदीवर, घरटे चार उभी 
होतील मोठी, तेव्हा वैकुंठाची पायरी

उभा आहे आज, पाठीशी तुझी थाप 
तुझ्या या लेकरास, मिळू दे भरारी 

सचिन कृष्णा तळे , पुणे 
७७०९०९९६४६


Wednesday, 19 September 2018

शंभूराज

दिव्य तेज रवी किरण शिवपुत्र शंभूराज 
केशरी ध्वज हिंदू रत्न महाराज शंभूराज 

कीर्तिवंत, बुद्धिवंत, शौर्यवंत, निष्ठावंत
स्वराज्य शिखर जय छत्रपती शंभूराज 

हिंदहृद्य तीरावर मराठमोळ्या शिरावर 
यौवन स्वबळावर विजयी हो श्री शंभूराज 

संस्कार अविष्कार मैदानी शूर धुरंदर 
मावळ्यांचा मैतर राजाश्रय तो शंभूराज 

म्लेंछ संहारक अन जनतेचा पालक 
मालक महाराष्ट्राचा एकमेव शंभूराज 

धर्म रक्षक त्यागवंत अवतार हा हनुमंत 
रामराज्य भूषण प्रभो शिवांश शंभूराज 

सचिन कृष्णा तळे , 7709099646




Monday, 17 September 2018

स्वछंद असा हा छंद

स्वछंद असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग
चंदनाचा सुगंध, दरवळे अंगअंग, तुझ्यात मी मग्न

पाहुनी झालो दंग, असा बेभान, तुझ्या रुपान 
फुलपाखराचे पंख, त्याचे ते रंग, करी मनात खंत
स्वछंद  असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग ...

आकाशी दिसे चंद्र, तुझे ते नेत्र, बेधुंद सागरात
रणकंद उठे मनात, पाहता अंत, तुझ्या भेटीत

जलतरंग , करी नृत , तुझ्या माझ्या प्रीतीत
त्या एकांतात,अश्या विरहात, भेट तुझी आसवंत
स्वछंद  असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग ...

झुंज माझ्या शब्दास , तुझेच भास, आसपास
आतुर मनास, ह्या ओठांस, लागे तुझीच प्यास

होऊनि रसवंत, घडावे सवांद , असे प्रेमाचे
काव्यातून,  मिलनातून, शब्द फुटावे अमृताचे 
स्वछंद  असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग ...

-सचिन कृष्णा तळे 
7709099646

Tuesday, 14 August 2018

हिंसाचार

"हिंसाचार", वाचा प्रतिलिपि वर :
http://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-wlq5IaXpXfqL?utm_source=android&utm_campaign=content_share


कोणी मनू जाळली, कोणी सविधान
कोणी माणूसकी ,कोणी आत्मसन्मान

ईथे जातीसाठी ,जातीवंत ठेकेदार
ईथे समाजकंठकांचे ,आहेत साथीदार
कोणी बंद पाळले ,कोणी घराचे दार
कोणी माणूसकी ,कोणी आत्मसन्मान

ईथे दगड हवेत ,हवा थोडा हिंसाचार
ईथे शहिदांसाठी ,मोजून माणसे चार
कोणी रक्त सांडले ,कोणी बंडाचे द्वार
कोणी माणूसकी, कोणी आत्मसन्मान

ईथे महापुरूषांचा ,केला जातो अपमान
ईथे राजकीय झेंड्यापुढे, झुकते ती मान
कोणी देश विकला, कोणी स्वाभिमान
कोणी माणूसकी , कोणी आत्मसन्मान

ईथे भय, दहशतवाद्यांचे अन मोर्चाचे
ईथे भय ,घरातल्याच लोकांचे
कोणी गीता वाचली ,कोणी बायबल कुरान
कोणी माणूसकी ,कोणी आत्मसन्मान

सचिन कृष्णा तळे
पुणे
7709099646

Thursday, 26 July 2018

काय हवे त्या पावसाला

चहू दिशांना आकाशातल्या त्या ढगांना
सांगा काय हवे, काय हवे त्या पावसाला

ऋतू कोवळे की ते रानमाळ मोकळे
का हिरव्या रानात, शब्दांचे सोहळे
इंद्रधनूच्या रंगांना त्या श्रावणी गंधांना
सांगा काय हवे, काय हवे त्या पावसाला

वीज झळके कि थरथरे अंग ऋतूचे
का बंदिस्त व्हावे घरट्याचे दार सारे
बळीराजाच्या मातीला त्या गावाच्या वेशीला
सांगा काय हवे, काय हवे त्या पावसाला

रंग चोरटे कि भिजलेले ते मुखवटे
का धुक्याच्या आड सांडलेले दुखवटे
मानवी खेळांना त्या धुंद लहरींना
सांगा काय हवे, काय हवे त्या पावसाला

 सचिन कृष्णा तळे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale