Wednesday, 20 April 2022

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ

 



मुस्लिम समाजात जी बोली भाषा वापरली जाते त्यात प्रामुख्याने उर्दू अन हिंदी भाषेचा प्रभाव हा जास्त असतो. काही ठिकाणी पारशी शब्दांचा वापर हि ते करताना दिसतात. ज्या मुस्लिम परिवाराचा जन्म हा महाराष्ट्रात झाला आणि ज्यांनी त्यांचे शिक्षण हे मराठी भाषेतून केले अश्या लोकांच्या मराठी भाषेला एक लय दिसून येते. महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण हे मराठीत लेखन करू पाहतात. त्या लेखनाचे प्रकाशन व्हावे त्यांना व्यासपीठ मिळावे त्यांचे साहित्य महाराष्ट्रात मराठी वाचकांपर्यन्त पोहचावे अशी त्या तरुणांची इच्छा असते. अश्या मुस्लिम लेखकांना मार्गदर्शन अन उत्तेजन मिळण्या हेतूने मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ ची स्थापना झाली. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय.

सण १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. ह्या मंडळा तर्फे तरुण मुस्लिम लेखक-कवींना योग्य लेखन-मार्गदर्शन करणे, त्यांच्या लेखनाला काव्याला प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी माध्यम उपलब्ध करूण देणे, नवलेखकांसाठी शिबिर भरवून त्यांना योगे ते मार्गदर्शन करणे अश्या विविध उपक्रम राबवले जातात.   या चळवळीची साहित्य संमेलने या आधी सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे झाली आहेत. जी संमेलने औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई व जळगाव आदी शहरांत झाली, त्यावेळी उस्मानाबाद येथील डॉ. बशारत अहमद, अहमदनगर येथील डॉ. बशीर मुजावर, रायगड येथील प्रा. फातिमा मुजावर व पुणे येथील डॉ. ए.के. शेख हे त्यांपैकी एकेका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

अनेक मुस्लिम साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली त्यात ए.के. शेख, बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी), मसूद पटेल, पद्मश्री डॉ यू. म. पठाण, जावेद कुरेशी, अजीज नदाफ, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, मुबारक शेख, बाबा मुहम्मद अत्तार, हुसेन जमादार, कलीम खान तसेच महाराष्ट्राचे लाडके गझलकार इलाही जमादार आहेत. मुस्लिम मराठी साहित्यिक हे सुद्धा मऱ्हाटी संस्कृतीचे व मराठी वाङ्मयाचे अविभाज्य घटक व वारसदार आहेत. अन्य मराठी साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रीय मुसलमान साहित्यिकही विविध लेखन प्रकारांतील यशाची शिखरे निश्चितपणे गाठतील अशी माफक अपेक्षेवर ह्या मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ चे कार्य चालू आहे.


सचिन कृष्णा तळे 

2 comments:

  1. खुप चांगला उपक्रम व पुढ़ाकार आहे सर्व मुस्लिम लेखकाना शुभेच्छा
    सचिन सर खुप कमी शब्दांत पण माहिती पूर्ण लेख आहे लेख वाचुन एक त्यातील विषय पाहुन आनंद व समाधान वाटले,

    ReplyDelete
  2. खुप चांगला उपक्रम व पुढ़ाकार आहे सर्व मुस्लिम लेखकाना शुभेच्छा
    सचिन सर खुप कमी शब्दांत पण माहिती पूर्ण लेख आहे लेख वाचुन व त्यातील विषय पाहुन आनंद व समाधान वाटले,

    ReplyDelete

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale