Tuesday, 17 March 2020

घडा आणि घडवा

घडा आणि घडवा 

एखादा माणूस आपल्या पूर्ण जीवनकाळात असे काही धाडसी व सामाजिक भान ठेवून महत्वपूर्ण कार्य, देशकार्य करतो कि त्यामुळे इतर लोकांना त्या व्यक्ति कडून प्रेरणा मिळते, एक नवी दिशा मिळते आणि त्याच ध्येय वेड्या लोकांचे चरित्र लिहल जात , वाचल जात त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अश्याच व्यक्तीमध्ये एकनाथजी रानडे आहेत ज्यांच्या कार्यातून वेवकानंदांच्या विचाराची गंगा सतत विश्वभर वाहत राहिली आणि आजून हि वाहत आहे. 

खरे एकनाथ जी रानडे मला विवेकानंद केंद्रातच अनुभवता आले कारण लेखक चा जसा विवेकानंद केंद्रा मधून सामाजिक प्रवास चालू झाला तसाच माझ्या हि प्रवासाची सुरवात विवेकानंदांच्या विचारातून झाली " घडा आणि घडावा ". ह्या पुस्तकाला समीर नर्लेकर ह्यांच मुख पृष्ठ असून त्याला विवेक विचार चे संपादक सिद्धाराम पाटील ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यामुळे कन्याकुमारी इथे उभारण्यात आलेल्या शीला स्मारक ह्याचा इतिहास कसा आहे, त्यासाठी कोण कोणते प्रयंत्न करण्यात आले आणि ती भव्य सुंदर शीला कशी उभी राहिली ह्याच वर्णन अतिशय सुंदर रित्या ह्या पुस्तकात मांडण्यात आले आहे . ४५ पानात आणि मोजक्या शब्दात एकनाथजी रानडे हे चरित्र मांडणे सोप कार्य नव्हते पण सामान्य वाचक वर्गाला  देखील समजेल अश्या साध्या सोप्या भाषेत ह्या पुस्तकाची निर्मिती करून सामन्यापर्यंत नाथांना पोहोचवण्याच कार्य पत्रकार सागर सुरवसे ह्यांनी केले आहे. 

महाराष्ट्राच्या मातीतून असे काही हिरे घडवले कि त्यांचा इतिहास देशाबरोबर जग हि वाचतंय. भारताच्या शेवटच्या टोकावर ज्या शिळेवर माता पार्वती ह्यांनी तप केला त्या कान्यकुमारीत श्रीपाद ह्या शिळेवर विवेकानंद ह्यांना अखंड भारताचे दर्शन झाले, अखंड भारताचे स्वप्न उभे राहिले त्याच शिळेवर मऱ्हाटमोळ्या नाथांनी एका भव्य स्मारकाचे स्वप्न पहिले आणि ती अस्तित्वात उतरवले. हे स्वप्न तरुण भारताला स्वाधीन करण्या आगोदर नाथांना स्थानिक पातळीवरून ते राष्ट्रीय पातळी का गाटावी लागली.  स्मारकाला परवानगी मिळवण्यासठी फक्त दोन दिवसात ३२३ खासदारांची सह्या घेवून कितीतरी अधर्मीय राजकीय लोकांचे मनसुबे नाथानी धुळीस कसे पाडले, शिक्षित कार्यकर्त्यांची संघटना तयार करून स्मारकासाठी निधी गोळा करण्या पासून ते शिळेला विरोध करणाऱ्या काही ख्रिश्चन मिशनरी गटांना सामोरे जाण्यापर्यंत आणि सरकारला स्मारकाचे महत्व पटवून देवून ,जातीने स्मारक निर्माती साठी दिवस रात्र एक करून, ह्या भव्य शिलास्मारकाची कथा ह्या पुस्तकातून उलगडली गेली आहे.

स्मारकाला होणारा विरोध पाहता नाथानी पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांना भेटण्याचा प्रयन्त देखील केला परंतु भेट झाली नाही. आता स्मारकाचं स्वप्न हे एकटे नाथानाच नसून विवेकानंदांच्या त्या प्रत्येक चाहत्यांचे होते त्यामुळे  नाथानी राष्ट्र पातळीवर कार्य चालू केलं. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. केवळ दगड धोंड्याचा स्मारक बांधून  उपयोग नाही विवेकानंदाचे विचार त्यांचे कार्य देशभर पसरवण्यासाठी ५०० हुन अधिक शाखेत स्वाध्याय वर्ग , संस्कार वर्ग आणि योग्य वर्गाची सुरुवात केली. विवेकानंद स्मारक उभे राहू नये म्हणून त्या जागेवर काही ख्रिश्चन लोकांनी एक क्रॉस उभारला. १९३२ रोजी ती जागा हि हिंदू समाजासाठी पवित्र स्थान आहे हे सरकारला समजवून सांगून सरकारच्या आदेशाने शिळेवरचे क्रॉस हटवण्यात आले. परंतु पुन्हा ख्रिश्चन लोकांनी विवेकानंदांची शिला समुद्रात फेकून दिली. हा धार्मिक विरोध चालू असताना नाथानी स्मारकाचे स्वप्न पूर्ण केलं. 

एकनाथांचे बालपण ते संघकार्यात त्याची भूमिका, लोहपुरुष वल्लभ भाई पटेल ह्यांच्यातील सवांद , संघाचा राजकीय पक्ष नको? , स्मारकासाठी लागणार निधी ते स्वप्नपूर्ती आणि शेवट पतंप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी त्यांच्या शब्दात विवेकानंद केंद्राची माहिती तसेच काही नावाजलेल्या मान्यवरांची प्रतिक्रिया ह्या पुस्तकात देण्यात आली आहे. हे पुस्तक तरुण युवा वर्गाला चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी धडपड कशी असते हे वाचायला शिकायला मिळते. 

पुस्तक - एकनाथजी रानडे ( जीवन आणि कार्य )
लेखक - सागर सुरवसे 
प्रकाशक - चपराक 
पाने - ५६
किंमत - ७५ 

सचिन कृष्णा तळे

Saturday, 22 February 2020

आनंदवनच आत्मचरित्र


आनंदवनच आत्मचरित्र

मुरलीधर देविदास आमटे म्हणजे आपले पद्मश्री आदिवासी सेवक कुष्ठरोगी समाजाची संजिवनी डॉक्टर बाबा आमटे. माझ्या आयुष्यात मी पहिलं आत्मचरित्र वाचाल ते बाबा आमटे ह्यांचं आणि तेव्हापासून मला आमटे परिवाराची गोडी लागली. विश्वात ज्यांचं कार्य दखलपात्र ठरल ते बाबा आमटे प्रकाशाच्या दिशेतून जाती धर्माच्या भिंती ओलांडून एका अश्या समाजाच्या जवळ गेले ज्याला आपल्या लोकांनी वाळीत टाकलं होत, दूर लोटून त्यांचं आयुष्य अंधारमय केलं होत, तश्या लोकांसाठी बाबा स्वतः सर्व सुख सोडून त्या कुष्ठरोगी काळोख्यात प्रकाशमय झाले आणि त्यांना समाजात पुन्हा घेऊन आले. कुष्ठरोग एक असा आजार एक अशी यम यातना ज्याचा विचार हि मनाला धडकी भरवून जायची. त्यावेळी उपचार नसल्यामुळे अश्या लोकांना समाजापासून दूर लोटलं गेलं. आज त्यांच्याच अद्भुत शक्तीने बाबांच्या श्रमाने आनंदवन हे सुंदर गाव वसलं आणि ग्रामपंचायत उदयास आली. बाबांचा हाच वारसा डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे ह्यांनी अविरत चालू ठेवून समाजसेवेची हि पालखी खांद्यावर घेऊन आनंदाने मिरवली गाजवली. 

आजवर बाबांवर अनेक पुस्तके आलीत पण आनंदवनात घडलेले चमत्कार प्रयोगांवर एक हि पुस्तक नव्हतं , तस पुस्तक समाजात यायला पाहिजे म्हणून डॉ. विकास आमटे ह्यांच्या अनुभवातून त्यांच्या नजरेतून गौरी कानेटकर ह्यांच्या शब्दांकन ने आनंदवन प्रयोगवान हे पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं. आनंदवनात प्रयोगांना खरी सुरवात झाली ती बाबांच्या श्रमाश्रम ह्या प्रयोगाने " श्रम + आश्रम = श्रमाश्रम ". तेव्हापासून आनंदवनात असंख्य यशस्वी प्रयोग झाले. त्या सर्व प्रयोगाची पाने ह्या पुस्तकात उलगडली गेली . माझ्या मते हे पुस्तक म्हणजे आनंदवनचे आत्मचरित्रच.  कुष्ठरोग चे जंतू हे माणसा शिवाय कोणत्याच प्राणीच्या शरीरात विकसित होत नाही म्हणून त्यावर उपचार होऊ शकले नाही ह्याच कारणाने बाबानी स्वतःवरच प्रयोग केला, कुष्ठरोग चे जंतू स्वतःच्या शरीरात विकसित करून त्यावर मात करत आज कुष्ठरोगी चे आयुष्य बदलून टाकले. ह्या यशस्वी प्रयॊगानंतर आनंदवनात नव्या नव्या प्रयोगांची साखळीच तयार झाली आणि हे प्रयोग मानवजातीच्या उत्कर्षासाठी महत्वपूर्ण ठरले . ह्या पुस्तकात आनंद वनातले जुने फोटो हि माहिती सहित प्रकाशित करण्यात आले आहे.

ताई आणि बाबानी सरकारकडून मिळालेल्या एका जंगलात त्यांचं कार्य सुरु केलं. वाघ , बिबटे ,साप , विंचू सारख्या प्राण्यांच्या सहवासात कुष्ठरोगी ची सेवा चालू झाली आणि बघता बघता हे वटवृक्ष इतकं वाढलं कि त्याच्या छायेत येणारा प्रत्येक व्यक्ती हा आनंदी समाधानी होऊ लागला. समाजातल्या विरोधाला तोंड देत विश्वाच्या कौतुकीची थाप घेत बाबानी ताईंनी आनंदवन फुलवलं. विनोबा भावे ह्यांच्या शब्दात सांगायचं तर आनंदवन म्हणजे सेवेचे रामायण जिथला राम आणि सीता बाबा आणि ताई , कुष्ठरोग्यांसाठी वनवासात येऊन सोबत लव कुश घेऊन दुसरी अयोध्या जन्माला घातली.

वरोऱ्याच्या आसपास सायकल वर फिरत " ट्रेस अँड ट्रीट कॅम्पन "चालू करत सुरवातीला रुग्नांचे शोध घेत आनंदवन च्या आसपास अकरा उपचार केंद्र सुरु केले. त्यांच्या ह्या कार्यात देश विदेशातले पाहुणे स्वखुशीने रुग्णांचे सेवा करू लागले. आनंदवनात दरवर्षी "लहानू बाबांची जत्रा भरते " म्हणजे डॉ. तात्याराव लहाने ह्यांच्या हातून मोतीबिंदु शस्त्रक्रिया चा प्रयोग, पुण्याच्या नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे तिरळे पणा घालवणारी शस्त्रक्रिया चा प्रयोग, पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड करण्यासाठी "आनंदवन मेड" पॉलिहाऊस चा प्रयोग. आनंदवनातलं मलमूत्र वाया जाऊ नये म्हणून बायोगॅस प्लांट उभारला रोज पंधरा लपीजी सिलेंडर इतका गॅस निर्माण करण्याचा प्रयोग. " शी व्हिटॅमिन " मुळे तलावातले माश्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयोग , चरखा खादी उद्योगाचा प्रयोग , तीन कॅन च्या प्रयोगांत वरोऱ्यात प्रिंटिंग प्रेसला सुरुवात केली. कुष्ठरोगींना स्वालंबी बनवण्यासाठी संधी निकेतन ची स्थापना करून त्यांच्या हाताला बळ दिले कला कौशल्यातून रोजगार देण्याचा प्रयोग. आनंदवन औद्योगिक केंद्रा मध्ये अनेक छोटे मोठे कारखाने चालू करून औद्योगिक क्रांती घडवण्याचा प्रयोग. आनंदवन निकेतन महाविद्यालय ची सुरुवात , अंध कर्ण बधिर मुलामुलींची शाळा मधून शिक्षणाचा प्रयोग. लातूर किल्लारीच्या भूकंपग्रस्त लोकांसाठी आनंदवनातली भूकंपरोधी घरे उभारून देशात भूकंपविरोधी घरे निर्माण करण्याचा प्रयोग. आनंदवन लँड आर्मी ने बांधलेला प्लास्टिक - टायर - क्रॉंकीत चा बंधाराचा प्रयोग. टाकाऊ कचर्यपासून टिकावू वस्तूंचा प्रयोग ,  मित्रांगण कम्युनमधून नुबीयन व्होल्ट पद्धतीचे घरांचा प्रयोग, स्वरानंदवन मधून कलाकारांना समाजसमोर स्वतःची कला सादर करण्याचा प्रयोग... असे अनेक प्रयोगाची माहिती आणि त्यासाठी घेतली गेलेली धडपड ह्या आनंदवन प्रयोगवन ह्या पुस्तकात डॉ. विकास बाबा आमटे ह्याच्या स्वप्नातून प्रकाशित करण्यात आले आहे त्यामुळे हे आनंदवन चे आत्मचरित्र वाचून समाजात आपल्या आसपास असेच प्रयोग नव्य तरुणांनी बाबांचे आदर्श घेत साकार करावे.

शब्द - डॉ. विकास बाबा आमटे
प्रकाशक - समकालीन प्रकाशन
पाने - १९०
किंमत - २५० रुपये
संपादन - सुहास कुलकर्णी



- सचिन कृष्णा तळे 



Friday, 7 February 2020

घोरपडे घाट इतिहासाचे साक्षीदार

घोरपडे घाट इतिहासाचे साक्षीदार

आपले गाव हे स्मार्ट सिटी व्हावं, आपल्या गावात सर्व सुख सोयी मिळाव्या हे प्रत्येक नागरिकांचं स्वप्न असत. माझं घर, माझं गाव, माझं शहर अन माझा ऐतिहासिक ठेवा. ऐतिहासिक ठेवा म्हणजे आपल्या पूर्वजांची ओळख.

आपण आपल्या मुलांना इतिहास शिकवतो त्यांना इतिहासाची माहिती देतो त्यासाठी त्यांना ऐतिहासिक स्थळावर घेऊन जातो त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य आणि त्यातून देव देश समाज कसा घडला ह्याची ओळख करून देतो. आपण जरा विचार करूया! जर हे स्थळ नष्ट झाले तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवू ... घाणीच्या साम्राज्यात कुजत पडलेले हे शौर्याचे अन वीरतेचे प्रतीक की एके काळी अमुक गोष्ट इथे घडली होती आणि अमुक असा इथे वाडा होता, हे सांगणार आहोत? पुण्यातील सगळ्यात जवळच उदाहरण देण्याचं झालं तर. एके काळी सात मजली असलेला शनिवार वाडा आपल्या अद्याप उभारता आलेला नाही. त्याच्या आजूबाजूस असणारे अतिक्रमण आपल्याला हटवता आले नाही. शनिवार वाड्यात भेटी देणारे लोकांची संख्या दिवसंदिवस वाढतीय त्याप्रकारे दर ही आकारले जातात. पण जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा काही अवशेष अस्थव्यस्थ तर काही माहिती फलक ते ही तुटक्या फुटक्या अवस्थेत आढळतात. आपण त्या विशाल सिंधू सागराच्या छाताडावर मुंबई किनारी छत्रपतींच भव्य स्मारक उभे करू शकतो. कामगारांच्या त्या जागेवर भव्य दिव्य स्मारकाचे योजना आखू शकतो त्यासाठी पैसा व राजकारण करू शकतो .त्याची स्वप्ने जनतेला दाखवू शकतो. परंतु आपण ज्या ठिकाणी इतिहास घडला.. ज्या जागेवर त्या वीर महा पुरुषांनी बलिदान दिल .. जिथे स्वराज्याची ध्वजा मानाने फडकावली गेली त्या जागेवर त्याकाळी जे वैभव होत, किमान त्याचे पन्नास टक्के तरी वैभव पुढच्या पिढीसाठी पुन्हा उभारू शकत नाही? किंवा त्या साठी आपल्याकडे अनुदान ही नाही? किंवा वेळ च नाही असं म्हणावं लागेल.

पुण्यातली वाढती लोकसंख्या, समस्या आणि कमी पडत चाललेले रस्ते ह्यातून पालिकेला, सरकारला कदाचित लक्ष्य देता येत नसावे. पण हा वारसा जपण्यासाठीच वारसा विभाग तयार केले गेले. फक्त ऐतिहासिक वारसाची नोंद ठेवण्यासाठी . पुण्याच्या मध्यवर्गीय भागातून वाहणारी मुळा मुठा तिच्या पात्रात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यातला एक घोरपडे घाट . हा घोरपडे घाट किती पुणेकरांना माहित असावा हे माहित नाही. 

गेल्या काही वर्षांपासून सतत माझ लक्ष वेधून घेतय ते म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या थेट समोर असलेल सुंदर असा घोरपडे घाट . त्याची तटबंदी  कोरीव दगडी चिरा, सुंदर पायऱ्या .. अन तिथे विसावलेले सुंदर असं शिव पिंड आणि नंदी . हे पाहताना उत्सुकता वाढते अन मन तितकंच अस्वस्थ होत. त्याच्या भोवती असणारे घाणीचं साम्राज्य अन त्यात देवाचा होणारा अपमान ... मान खाली टाकण्या शिवाय दुसरा पर्याय तरी काय? त्या संबधी पालिकेला विचारणा केली तर उत्तरे ही असमाधानकारक . वारसा विभागाला घोरपडे घाट आणि त्यासंबंधी साध फलक सुद्धा लावता आला नाही.

१० फेब्रुवारी १८३१ रोजी श्रीमंत यशवंतराव घोरपडे दत्तवाडकर यांचे पुत्र श्रीमंत दौलतराव घोरपडे यांनी ‘घोरपडे घाटाची निर्मिती केली होती.पूर्वी या परिसरात दौलतराव  घोरपडे दत्तवाडकर यांच्या मातुःश्री बयाबाई घोरपडे यांची समाधी होती. यालाच ‘कळकीचा बाग’ संबोधले जात होते. आठ एकर एकविस गुंठ्यांमध्ये असणारा हा परिसर ब्रिटिश सरकार कडून दौलतराव घोरपडे दत्तवाडकर यांना इनाम म्हणून देण्यात आला होता. या ठिकाणी शंभू महादेवाचे भव्य मंदिर होते. मात्र १९६१ मध्ये आलेल्या महापुरात ते वाहून गेले. सध्या घोरपडे घाटाची फारच दुरवस्था झाली आहे.असा ऐतिहासिक ठेवा आसणारा हा घोरपडे घाट  छत्रपती शिवाजी महाराज पुलाच्या बाजूला आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि कचऱ्याच्या ढिगामध्ये मोडकळीस आलेल्या घाटाच्या दगडी चिऱ्यांचे बुरूज व पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. शहरविकासाच्या प्रवाहात हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होऊ नये याची काळजी सर्वानी घेऊन ह्या वास्तू पुनरुज्जीवित कराव्यात. यासाठी स्वतः घोरपडे ह्यांचे वंशज पुढे सरसावले आहेत. दिनांक 02/02/2020 रोजी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान च्या वतीने ह्या घोरपडे घाटावर स्वच्छता आभियान राबवण्यात आले यावेळी संजय घोरपडे, दिपक घोरपडे, अनूराधा घोरपडे तसेच काही नागरिक उपस्तिथ होते. तरी हा घाट पुनःनिर्मण करणे हे प्रत्येक पुणेकरांचे कार्य आहे .

सचिन कृष्णा तळे ( सामाजिक कार्यकर्ते )
७७०९०९९६४६

       

Thursday, 6 February 2020


माननीय महोदय

नमस्कार
मी सचिन कृष्णा तळे , वय ३३ राहणारा पुणे कात्रज महाराष्ट्र . एक भारतीय नागरिक म्हणून हि जनहित याचिका दाखल करतोय त्याचा स्वीकार करावा हि विनंती.
महोदय , देशात महिलांवर अत्याचार आणि बलात्कार सारख्या अघोरी किळसवाणी प्रकरण, असल्या घटना ह्या वाढत चालल्या आहेत वारंवार घडत आहेत . गेल्या काही वर्षात बलात्काराच्या घटनांत वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा समोर येतोय. सरकार आपल्या परीने त्यावर उपाय योजना कार्यवाही करतीय तरीही असल्या घटना घडतायत कारण प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कक्ष पोहचू शकत नाही . त्यासाठी मी आपणस विनंती करतो कि देशात प्रत्येक महिलांना स्वतःच्या सुरक्षेसाठी हत्यार बाळगण्याचे अधिकार द्यावे त्यासाठी हवे तर नियम तयार करावे. असे हि पंजाब प्रांतात शस्त्र बाळगण्याचे अधिकार देण्यात आले आहे.
फायदे -
) शस्त्र हे १८ वर्षांपुढील महिलांसाठी असावे , त्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या महिलेला आधी स्वतःची सुरक्षा कशी करावी ह्याची प्रक्षिशण सरकारी निम सरकारी संस्थांकडून घेणे बंधनकारक आसवं आणि त्या त्या शस्त्राची नोंद हि सरकारी कागद वर नमूद असावी .
) जर १८ वर्षांपुढील महिलांकडे शस्त्र असेल तर तिच्या कडे शस्त्र पाहून कोणता हि पुरुष तिला छेडण्याचा प्रयत्न करणार नाही . तिच्या आड जाणार नाही .
) तिच्या कडे शस्त्र असल्यास तिला हि भीती वाटणार नाही आणि खंबीर पणे स्वतःची ती सुरक्षा करू शकेल . त्या शस्त्राची पूर्ण जवाबदारी हि त्या महिलांची असेल.
)  ह्या निर्णयाने बलात्कार सारख्या घटनाना  नक्कीच आळा बसेल असे मला वाटते.
) जर एखाद्या महिलेने शस्त्राचा उपयोग स्वार्थासाठी फसवणूक म्हणून केला असेल तर तिच्या वर दंडात्मक कार्यवाही करावी . तसे नियम अटी शस्त्र घेताना सांगण्यात यावे . आणि शस्त्रना एक युनिक नंबर देण्यात यावे .

कृपया ह्याचा विचार करावा , हवं तर काही महिन्यासाठी ती राबवण्यात यावे किंवा महिलांकडून मत जाणून घ्यावे हि विनंती आणि कळवावे .

सचिन कृष्णा तळे
तिरुपती निवास
लेन नंबर
डाके चौक सुखसागर नगर भाग
कात्रज पुणे ४६
७७०९०९९६४६










Wednesday, 5 February 2020

महिलांवर अत्याचार का वाढत आहे ?

महिलांवर अत्याचार का वाढत आहे ?

मुळात आपली न्याय प्रणाली आणि त्याला लागणारा विलंब, हाच कारणीभूत आहे. असले हिंसात्मक कृत्य करणाऱ्यांना भीती उरली नाही. जनतेतून धडा शिकवायचा झाला तर तो कायद्यात बसत नाही. निर्भया च्या दोषींवर आजून कार्यवाही नाही. खरं सांगायचं तर देशात रोज बलात्कार घडतात पण जे सोशल मीडियावर वायरल होतात तेच उजेडात येतात. इस्लामिक राष्ट्रात ज्या प्रकारे शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा भारतात दिली जावे. तेव्हाच कुठेतरी आळा बसेल. महिलांनी कसे वागावे हे महत्वाचं नाही महत्वाचे आहे वासनेत असले किळसवाणी कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करणे. आणि हि भीती फक्त न्यायप्रणाली करू शकते .


सचिन कृष्णा तळे
कात्रज पुणे
७७०९०९९६४६

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale