Monday, 1 March 2021

कविता

 काही कवींच्या कविता त्यांचा काव्यसंग्रह हा वाचताना ताे वारंवार वाचावा अस वाटतं. तर काहींच्या कविता वाचता वाचता ताे काव्यसंग्रह बाजूला ठेवून द्यावासा वाटताे. 


कारण एक वाचक म्हणून रसिक म्हणून मला जे हव तेच मिळाले नाही तर ते वाचून त्यावर वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेळ वाया घालवणे. 


कविता मग ती काेणत्याही छंदात असाे काेणत्याही वृत्तात असाे  लेखकाला जे सांगायचे आहे ते कमी शब्दात ताे मांडताे आणि नेमके त्यातूनच वाचणाचा आनंद मिळत जाताे


वाचता वाचता एक चित्र उभे राहते. जिभेवर " वाह " शब्द विरघळताे.. आणि हृदयात समाधानाची ..प्रेमाची ..विरहाची.. आपल्या पणाची.. दूखाची .. एखाद्या घटनेची भावना निर्माण हाेते . 


हाेय.. मी त्याच कविता वाचताे ज्या कवितेत कवीची समाधी लागली आहे आणि ती कविता संपली कि दुसर्या कवितेत ताेच कवी पुन्हा जन्म घेताे माझ्यासाठी. 


#आहेतेआहे

सचिन कृष्णा तळे

Thursday, 28 January 2021

सावधान हिंदुस्थान

 पाक बंगाल ते हिंदुकुश पर्वतरांगा पर्यंत आपला भारत हा अखंड भारत व्हावा ह्याची स्वप्ने पाहत देव देश धर्मासाठी कार्य करणारी धडपडणारी तरूण मंडळी. विवेकानंदांचे आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून भारत हा विश्व विजयी व्हावा विश्व गुरू व्हावा ह्याची स्वप्ने पाहणारा तरूण एकिकडे... 


तर 


काश्मीर, पश्चिम बंगाल, हैद्राबाद, पाकव्याप्त ,चीन व्याप्त प्रदेश भारतापासून अलग करू पाहणारी . भारतीय झेंड्याचा अपमान करत भारताचे तुकडे करू पाहणारे तरूण जे धर्मावरून जातीवरून समाजात क्लेश निर्माण करून स्वतः चे करियर घडवणारे काही तरूण दुसरीकडे... 


तर 


राेजच्या जीवनातून मिळेल त्या पगारावर काम करत कष्ट करत संसार संभाळत समाजात बदल घडवत सामाजिक कार्य करणारे तरूण...


नक्की ह्या देशाचे भविष्य काेणाच्या हातात आहे ह्याचा विचार झालाच पाहिजे तरच हा देश सुजलम सुफलाम् हाेईल अन्यथा सावधान हिदूस्थान..!! 


जय हिंद 

सचिन तळे

Tuesday, 12 January 2021

१२ जानेवारी दिन विशेष

 विवेकानंद आणि माँ साहेब जिजाऊ ह्यांची देशभक्ती धर्माप्रती कट्टरता जेव्हा आपण आपल्यात सामावून घेऊ त्याला आचरणात आणू तेव्हा ह्या देशाची सीमा आणि देशातील तरूण सुरक्षित राहतील.. एक हाेतील. 


 विवेकानंद हे तारूण्याचे प्रतिक आहे युवकांचे आदर्श ज्यांनी सातासमुद्रापार जाउन देश धर्म अन आपल्या संस्कृतीची ध्वजा फडकवली. उच्च शिक्षण घेउन विदेशात जाउन विदेशाचे गाेडवे गाणारे युवक नकाे तर ह्या देशात राहून देशाची गाेष्ट अभिमानाने जगासमोर मांडणारी युवा ह्या देशाला हवेत हिच ईच्छा विवेकानंदांची हाेती. 


माँ साहेब जिजाऊ नी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल . संभाजी महाराजांवर संस्कार केले अगदी तसेच संस्कार आपल्या देशातल्या प्रत्येक मुलांमध्ये असावे. जेणे करून देशात स्वराज्य संस्कार अखंड राहील. 


त्यामुळे भले आपण दिवस पाहून त्यांच्या आठवणीला त्यांच्या कार्याला सलामी देउ साजरी करू पण जाेपर्यंत आपण आपल्या घरात आई जिजाऊ आणि प्रत्येक मुलात विवेकानंद घडवत नाही ताे पर्यंत आपल्याला त्यांच्या कार्याची खरी ओळख हाेणार नाही. ताे पर्यंत आपल्याला आपला देश कळणार नाही आपला धर्म कळणार नाही आपली माणस कळणार नाही. 


जेव्हा विवेकांनद घडतील तेव्हा युवकांचे धर्मांतर हाेणार नाही.. आणि जेव्हा जिजाऊ घडेल तेव्हा देशाचे देशांतर हाेणार नाही.. 


जय हिंद 


सचिन तळे

Thursday, 10 December 2020

कविते शब्दात ये...

 हातात लेखणी घेऊन

तूला लिहण्याचा 

खुप प्रयत्न करताेय

पण 

ह्या दूषित वातावरणात

तू मला दिसेना ... 

तू  मला कुठेच दिसेनाशी झालीय 

तूझ्या मूळे माझ्यातला कवी 

तुझ्यामुळे माझी लेखणी

एकांती पडलीय

हे कविते 

शब्दात ये ...!! 


- सचिन तळे 🙏🙏




Saturday, 26 September 2020

नशेची दुनिया

 नशेची दुनिया....!! 


दिवसभर ड्रग्ज आणि चित्रपट सृष्टीतल्या चरसी लाेकांच्याच बातम्या. राज्यात ह्यापेक्षा दूसरा विषयच नाही. राज्यात असेलेले सर्व विषय आता संपले. सर्व लाेक सुखी आहेत. सगळीकडे आनंद आहेत... म्हणून तर फक्त एकच पाढा सतत वृत्तवाहिनी वर गिरवला जाताेय. हे असेच चालू राहिल तर कालांतराने देशात राष्ट्रीय ड्रग्ज दिवस साजरा करताना दिसतील तरूण मंडळी. आणि त्यावर बंदी आणली की लाेकशाही लाेकतंत्रांच्या मंत्रा खाली आझादी मागत उर बडवतील. सगळे नशेत आहेत. 


आणि हाे आपल्या लाेकशाहीत आता पत्रकार हि लेखणी साेडून शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलीत एकमेकांना मारू लागलीत.. अजून काय पाहायच राहिलय. आरे हि सुध्दा एक नशा आहे. 


काही सत्ताधारी वर्गाला सत्तेची नशा .. तर काहीना पैश्याची नशा.. तर काहींना प्रसिद्धी ची नशा.. त्यासाठी वाटेल ते वाटेल तसे घडवून आणल जात. आणि हि नशा देशाला तुम्हाला आपल्याला घातक आहे. 


सचिन कृष्णा तळे

#आहेतेआहे

Friday, 25 September 2020

कंत्राट म्हणजे सगळ्यात माेठा सट्टा

 कंत्राट म्हणजे सगळ्यात माेठा सट्टा.... 


कंत्राट करार पध्दतीवर लाेकांना कामावर ठेवून त्यांना हव तेव्हा हव तसे राबवून त्यांच्या कडून कष्टाचे काम करून घेउन त्यांना हव तेव्हा कामावरून सहज कमी करता येत. हा सर्वात माेठा फायदा हा कारखानदार लाेकांना असताे. काही टिकाणी त्यांची युनियन असते तर काही ठिकाणी नसते. ६ महिने ११ महिन्याच्या ह्या कंत्राटी पध्दतीने अनेकांचा जीव घेतलाय अनेकांना बेराेजगार केलय. कारखानदारांचा एकमेव फायदा म्हणजे जेव्हा उत्पादन कमी हाेत तेव्हा त्यांना कमी करायच आणि स्वताची आर्थिक बाजू शाबूत ठेवायची. 


कंत्राटी वर मुल मुली किवा कामगार भरती साठी एक कंत्राटदार हि नेमला जाताे जाे ह्या मुलांचा त्यांच्या मेहनतीचा काही हिस्सा भाग स्वता खाताे तसेच त्या कंपनीच्या अधिकारी वर्गाला ही खाउ घालताे. बर ईतकच नाही तर काही ठिकाणी हा कंत्राटदार दूसरा तिसरा काेणी नसून तिथला स्थानिक नेता हि असताे आणि आहेत आज ही. पुण्यात जर विचार करायचा तर रांजणगाव चाकण उद्योग वसाहत मध्ये माेठ्या प्रमाणात हा कामगारांचा श्रमिकांचा जुगार खेळला जाताे. 


हाे हा खूप माेठा जुगार सट्टा आहे जाे राजकिय नेते आणि कारखानदारांच्या मधे खेळला जाताे. त्यात बळी कामगारांचा जाताे. सुरूवातीच्या काळात ह्या कंत्रीट पध्दतीचा खुप माेठा ताेठा मी सहन केलाय आणि खूप जवळून पाहिले देखील. आज ही अनेक कामगार हे दहा बारा वर्षे काम मेहनत करून फक्त परमनंट हाेण्यासाठी लढा देत आहेत. 


जवळच उदाहरण सांगायच तर ह्या २०२० मधे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी झाले म्हणून राताेरात कामगारांना कमी केले गेलय. त्यावर ते काहीच करू शकत नाही कारण कामावर रूजू हाेताना तसा त्यांचा एक agreement करार केला जाताे ज्यावर त्या कामगारांची सही असते त्याची त्या सर्व अटी नियमाची तयारी असते( अर्थात त्या वेळी त्या कामगाराला कामाची गरज असते त्यामुळे ताे मिळेल त्या कागदावर सही करताे ) .


बर हा प्रकार काही खाजगी क्षेत्रात आहे असे नाही तर सगळ्यात जास्त कंत्राटी कामगार हे सरकारी क्षेत्रात अाहे. फक्त एका आशेवर की त्यांना काही वर्षानंतर परमनंट केले जाईल. पण सगळ्यांचा च वशिला नसताे हाे. ज्याचा वशिला त्याचा बाप काशीला म्हणतात ना. 


असाे मी स्वतः ह्या कंत्राट पध्दतीच्या विरोधात आहे आणि पुढे हि राहणार... 


सचिन कृष्णा तळे

#आहेतेआहे

Monday, 21 September 2020

वृत्तवाहिनींचा उतावळेपणा

 वृत्तवाहिनींचा उतावळेपणा


कामावरून घरी आलाे आणि नेहमीप्रमाणे फास्ट सुपर फास्ट बातम्या ( फक्त एका आेळीचे) पाहण्यासाठी टिव्ही चालू केला. ठळक बातम्या एका वरून एक एेकताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांची एक बातमी पाहिली. कि राजसाहेब ठाकरे ह्यांना मास्क न वापरला म्हणून १००० रूपयाचा दंड भरावा लागला वैगेरे वैगेरे... म्हंटले छानच काेणी ही असाे चूक झाली तर दंड भरलाच पाहिजे. पण एक जवाबदार नेता विना मास्क असा बाहेर पडणार नाही हे मात्र खात्री हाेती आणि चूकून जरी ते विना मास्क बाहेर पडले तर त्यांनी दंड भरला हे उत्तम. 


पण विषय पहा.. राज साहेब ठाकरे बाहेर कुठे हि गेलेच नाही तरीही त्या क्लिप्स ची पडताळणी न करता सहज ठळक बातम्या आपल्या वृत्तवाहिनी ने प्रसारित केली. बातम्या दाखवण्याचा हा उतावळेपणा कितपत योग्य आहे. असे किती बातम्यांवर आम्ही विश्वास ठेवावा कितीवर न ठेवावे? राेज कामावरून थकून जेव्हा आपण घरी येताे तेव्हा वृत्तवाहिनी हि एकमेव पर्याय असताे जिथून आपल्याला आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा समाचार मिळत असताे. त्या ठिकाणा पर्यंत आपण पाेहचताे. तिथली परिस्थिती जाणून घेताे. आज हा जिवंत उदाहरण. 


वांद्रे स्टेशनवर जमलेली गर्दी हि त्याचाच एक भाग हाेता... 


ह्या अश्या बातम्यामुळे चुकिच्या माहितीने वृत्तवाहिनीचा विश्वास कमी हाेउ नये ह्यासाठी त्यांनीच पुढाकार घेयला हवा तरच लाेकशाहीचा चाैथा स्तंभ मजबूत राहिल. 


सचिन कृष्णा तळे

#आहेतेआहे




“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale